मद्यालयांना रात्री उशिरापर्यंत परवानगी, मग शांततेत कसं होणार नवीन वर्षाचं स्वागत ?
लाल दिवा-नाशिक,ता.३१: नाशिक नवीन वर्षाचे स्वागत वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते काही ठिकाणी देवदर्शन करून तर गुरु भेट घेत त्यांच्या चरणाशी लीन होत अध्यात्मिक, सामाजिक जीवनात सचेत कार्य करण्याचा संकल्प केला जातो तर काही ठिकाणी, एक दुसऱ्याच्या घरी जाऊन भेटीगाठी होतात यातून शुभेच्छा देत नव्या वर्षाचे स्वागत केले जाते अशा अनेक प्रकारे सकारात्मक व चांगल्या आदर्शवत पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागत केले जाते, हल्ली एक नवीन पद्धत जानतेपणी रुजवण्याचं काम बेधडक सुरू आहे ते म्हणजे नवीन वर्षाच्या स्वागता निमित्त सर्व परवानाधारक मद्य विक्री केंद्रांना तसेच बारमध्ये बसून यथेच दारूवर ताव मारण्यासाठी रात्री उशिरापर्यंत या मद्यालयांना देण्यात आलेल्या परवानग्या म्हणजे दारू पिऊन नवीन वर्षाचं स्वागत करावं असा ट्रेंड तर सेट होत नाही ना आणि उशिरापर्यंत परवानगी म्हणजे पिणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम नेमकी कोण करते? संस्कृती जपली की आपोआप पुढच्या पिढीपर्यंत चांगल्या विचारांचा वारसा पोहोचवला जाऊ शकतो रुजवला जाऊ शकतो यातून नवीन सुदृढ समाज घडू शकतो परंतु अशा प्रकारच्या परवानग्या देणाऱ्या व्यवस्थेलाच कुपोषित पण आलेलं असावं ह्या मताचे देखील बहुतांश लोक आहेत.
एका बाजूला उशिरापर्यंत परवानाधारक मद्यविक्री करणाऱ्या व परमिट रूम्स, बार यांना परवानगी देण्यात आली आहे आणि दुसरीकडे मात्र मद्यपींवर कारवाई करण्याची पोलिसांना सूचना देण्यात येते याचा अर्थ काय? म्हणजे तुम्हीच ग्राहातला दोष सांगायचा, तुम्हीच पूजा करायची आणि तुम्हालाच दक्षिणा घ्यायची.
नाशिक शहराची मद्यनगरी म्हणून ओळख निर्माण होत असताना पाच दिवसात दीड लाख वन डे मद्याचे परवाने देण्यात आल्याच्या बाबतीत कसा अभिमान बाळगायचा, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तळीरामांच्या रांगाच रांगा आजही सायंकाळी पाच वाजेपर्यंत मिळणार दारू पिण्याचे लायसन्स हे सर्व एकाच विशिष्ट दिवसासाठीच का ? म्हणजे फक्त नवीन वर्षाचे स्वागत करतानाच लोक दारू पितात का? त्याच वेळेला परवाना असणं, बाळगणं गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी इतर दिवशी का केली जात नाही ? दारू पिण्याचे नियम हे एकाच दिवसासाठी का पाळले जावे व सांगितले जावे या संदर्भात योग्य ती अंमलबजावणी रोजच व्हायला हवी तसं बघितलं तर परवानाधारकच दारू बाळगू शकतो पिऊ शकतो, परवाना नसेल तर संबंधित व्यक्तीवर कारवाई केली जाईल असा नियमच आहे मात्र रोज विनापरवाना किती दारू विकल्या जाते यावर प्रामाणिक नियंत्रण आहे का? राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परवानाधारक मद्यविक्री केंद्रांचे ऑडिट करतेवेळी विनापरवाना रोज विकल्या जाणाऱ्या दारूवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठोस पावलं का उचलत नाही. या सगळ्या चुकीच्या पद्धतीने प्रोत्साहन न देता दारू विक्री केंद्राची परवानगी देतानाच शासनाने ठरवून दिलेल्या वेळेपूर्तीच ही मद्यालये सुरू राहावीत, तसेच एका विशिष्ट दिवसापूर्वीच नियमांचे पालन करण्याची धडपड न दाखवता 365 दिवस हे नियम काटेकोर पाळले जातात का यावर विशेष लक्ष केंद्रित करायला हवं उशिरापर्यंत दारू मिळणार म्हटल्यावर तळीराम अभंग म्हणायला तर बसणार नाही उलट रस्त्यांवर बेधुंद होऊन कायदा व सुव्यवस्थेला बाधित करण्याचे काम त्यांच्याकडून होणार यास जबाबदार फक्त तो संबंधित तळीरामच असेल असे गृहीत धरून कारवाई केले जाते मग कारवाईदरम्यान विनापरवाना मद्यप्राशन केलेल्या व्यक्तीवर कारवाई तर करावीच मात्र संबंधित व्यक्तीने कुठल्या दुकानातून विनापरवाना दारू विकत घेतली त्यांच्यावर देखील योग्य ती कारवाई होणे अपेक्षित आहे, असो यासारख्या अनेक प्रश्नांची समर्पक उत्तर कधीच मिळू शकत नाही हे त्रिवार सत्य आहे नाईलाजाने त्याचा स्वीकार करावा लागत आहे.