प्रतिबंधीत ऑक्सिटोसीन केमिकलचा साठा जप्त….. मालेगाव किल्ला पोलीसांची कारवाई …..!

लाल दिवा : मालेगावात दुग्धजन्य जनावरांचे दूध वाढवण्यासाठी घातक औषधांची विक्री करण्याचे उद्देशाने साठवणूक केली जात असल्याचा प्रकार मालेगाव किल्ला पोलीसांनी हिरापुरा परिसरात केलेल्या कारवाईत उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलीसांनी एकास अटक केली असून ६० हजार रूपये किंमतीचा प्रतिबंधीत असलेला घातक औषधसाठा जप्त केला आहे.

मालेगाव शहरातील हिरापुरा परिसरात एका शेडमध्ये दुग्धजन्य जनावरांसाठी घातक असलेल्या ऑक्सिटोसीन केमिकलचा अवैध साठा असल्याची गोपनीय माहीती किल्ला पोलीस ठाण्याचे सपोनि गौतम तायडे यांना मिळाली होती. त्यानुसार किल्ला पोलीसांनी सदर बाबत अन्न व औषध विभाग, नाशिक यांना माहीती कळवून औषध निरीक्षक श्री. प्रशांत ब्राम्हणकर यांच्या उपस्थितीत सदर ठिकाणी छापा टाकून इसम नामे मोहम्मद अन्दर मोहम्मद इकबाल, वय ५५, रा. मोतीपुरा, मालेगाव यास ताब्यात घेतले. सदर इसम हा औषध निर्मिती, साठवणूक, विक्री किंवा वितरणाचा कोणताही परवाना नसतांना, नमूद ठिकाणी दुग्धजन्य जनावरांचे दूध वाढावे यासाठी वापरण्यात येणारे घातक औषध ऑक्सिटोसीन केमिकलचा साठा विक्री करण्याचे उद्देशाने साठवणूक करतांना मिळून आला आहे. त्याचे कब्जातून निर्बंध असलेले ऑक्सिटोसीन केमिकल १०० मिली मापाच्या १००० बाटल्या किं. रु.६० – हजार चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून सदर इसमाविरुध्द मालेगाव किल्ला पोलीस ठाणे गुरनं ८४ / २०२३ भादवि कलम ३२८, ४२०, १७५, २७२, २७४ सह प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११ (ग), १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलाचे अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव कॅम्प विभाग श्री. प्रदिपकुमार जाधव यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे किल्ला पोलीस ठाण्याचे सपोनि श्री. गौतम तायडे, श्रेपोउनि महाजन, पोकॉ पंकज भोये, सचिन भामरे, निलेश निकाळे, चापोहवा सुर्यवंशी यांचे पथकाने अन्न औषध विभागाचे औषध निरीक्षक श्री. प्रशांत ब्राम्हणकर यांचे उपस्थितीत सदर कारवाई केली आहे.

 

पोलीस पथकाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेवून पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी तपास पथकास १०,०००/- रू. चे बक्षीस जाहीर करून सर्वांचे अभिनंदन केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!