प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रेत्यांवर संक्रांत; मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर धडक कारवाई….”भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी”…..!

लाल दिवा-नाशिक,ता.१०:-मकरसंक्रात सणानिमित्त नाशिक शहरात पंतग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा मांजा हा नायलॉन दोरा असुन त्यावर काचेची कोटींगमुळे तो टोकदार व धारदार मांजा असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच सदर नायलॉन मांजाचे घर्षण होवुन मांजा तुटुन मोठया प्रमाणात उंच झाडे व इमारतींमध्ये अडकतो त्यामुळे वन्यपक्षी, प्राणी तसेच नागरीक जखमी होण्याचे प्रमाण व प्राण गमावण्याचे प्रमाण दिवसोदिवस वाढत आहे. नाशिक शहरामध्ये पतंगाच्या मांज्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये रस्त्यावरून जाणारे दुचाकीस्वार व सायकलवरील शाळकरी विद्यार्थी हे अपघात होवुन जखमी झालेले आहेत. नायलॉन मांजा लवकर तुटला जात नाही व त्याचा नाश होत नाही तसेच नायलॉन मांज्यामुळे विजेच्या तारांवर घर्षण होवुन पडणाऱ्या ठिणग्यांनी आग लागुन विजप्रवाह खंडीत होतात, विजकेंद्र बंद होतात, इलेक्ट्रीक उपकरणांना बाधा पोहोचते व त्यातुन अपघात होतात. त्याच्या दुष्परिणामामुळे सदर नायलॉन मांजाची निर्मिती, विकी, साठा व वापर यावर बंदी घातलेबाबत मा. श्री. संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी मनाई आदेश जारी केला आहे.

त्याअनुषंगाने मा.श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, मा. डॉ. सिध्देश्वर धुमाळ, सहा. पोलीस आयुक्त, सरकारवाडा विभाग, यांनी बंदी असलेला नायलॉन मांजाची निर्मिती, विकी, साठा व वापर करणा-यांवर कारवाई करणे बाबत आदेशीत केले होते. त्याप्रमाणे भद्रकाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. गजेंद्र पाटील, श्रीमती तृप्ती सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) भद्रकाली पोलीस ठाणे, नाशिक शहर यांनी गुन्हे शोध पथकाचे सपोनि सत्यवान पवार व पथकास बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री, साठा व वापर करणारे इसमांचा शोध घेवुन त्यांचेविरूध्द गुन्हे नोंद करणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे पोहवा /१८१६ संदीप शेळके व पोना / २५०२ लक्ष्मण ठेपणे यांना इसम नामे पद्माकर रतीकांत बकरे, रा. घर नं. १८०२, जुनी तांबट लेन, भद्रकाली, नाशिक हे त्यांचे राहते घरी पंतग विक्री व त्यासोबत नायलॉन मांजाची ही विक्री करीत असलेबाबत गोपनीय माहीती प्राप्त झाली होती. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने सदर बातमीची खातरजमा करणेकरीता मिळालेल्या बातमीचे ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी इसम नामे पद्माकर रतीकांत बकरे हा प्रतिबंधित नायलॉन मांजाची छुप्या पध्दतीने विक्री करीत असल्याचे आढळुन आला असुन त्याचे ताब्यात १५,७००/- रूपये किंमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे प्रतिबंधित नायलॉन मांजाचे एकूण २७ गट्टु मिळुन आल्याने सदर प्रतिबंधित नायलॉन मांजा व इसम नामे पद्माकर रतिकांत बकरे यांना ताब्यात घेवुन पोलीस ठाण्यात आणुन त्याचेविरूध्द पर्यावरण संरक्षण कायदा कलम ५,१५ सह भादंवि कलम १८८, २९०,२९१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा तपास चालु आहे.

नायलॉन मांजाचा वापर टाळा जीव वाचवा.।

सदरची कामगिरी ही मा.श्री. संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर, मा. श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, मा. डॉ. सिध्देश्वर धुमाळ, सहा. पोलीस आयुक्त, सरकारवाडा विभाग, नाशिक शहर, यांचे आदेशानुसार मा.श्री. गजेंद्र पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती तृप्ती सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), भद्रकाली पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनि / सत्यवान पवार, पोहवा / ३७४ नरेंद्र जाधव, पोहवा /१८१६ संदीप शेळके, पोना/२५०२ लक्ष्मण ठेपणे, चापोना/१७९२ महेशकुमार बोरसे, पोशि/२११३ योगेश माळी, पोशि/१५७७ सागर निकुंभ, पोशि/२७२७ धनंजय हासे, पोशि/१४६ नारायण गवळी अशांनी पार पाडली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!