बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार! आता सहन करणार नाही!
बांगलादेशातील हिंदूंना न्याय मिळावा! सकल हिंदू समाजाचा मूक मोर्चा
लाल दिवा-नाशिक,दि.८ :– बांगलादेश झपाट्याने हिंदूंसाठी मृत्युचा सापळा बनत चालला आहे! सत्तांतरानंतर तेथील हिंदू अल्पसंख्याकांना क्रूर अत्याचाराचा सामना करावा लागत आहे. स्वामी चिन्मानंद यांना अटक, त्यांच्या वकिलाची हत्या, दुसऱ्या वकिलावर हल्ला – ही काही उदाहरणे नाहीत तर बांगलादेशातील हिंदूंच्या दैनंदिन जीवनाचे भयावह वास्तव आहे!
जिझिया कर भरणाऱ्या हिंदूंनाही सुरक्षितता नाही. दहशतवादी कारवाया, हिंसक हल्ले यातून अनेक निष्पाप हिंदूंना आपले प्राण गमवावे लागले आहेत. बांगलादेशातील कट्टरपंथी बेछूट हिंदूंना लक्ष्य करत आहेत आणि सरकार त्यावर मूकदर्शक बनून बसले आहे.
जागतिक मानवाधिकार संघटना कुठे आहे? त्यांचे डोळे बंद आहेत का? १० डिसेंबर, जागतिक मानवाधिकार दिन, या निमित्ताने सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरला आहे. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी, भारत सरकारने तातडीने कठोर कारवाई करावी, बांगलादेश सरकारवर दबाव आणावा, ही मागणी आम्ही करतो!
हा मूक मोर्चा फक्त सुरुवात आहे. जर आमच्या बांधवांना न्याय मिळाला नाही, तर आम्ही अधिक आक्रमक आंदोलन करू, ही चेतावणी!
बिडी भालेकर मैदानावरून सकाळी ११ वाजता मोर्चाची सुरुवात. सागरमल मोदी शाळा, रेड क्रॉस चौक, मेहर चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन निवेदन देण्यात येईल.
- मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन!