जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुळधर वस्ती येथे बाल आनंद मेळावा संपन्न …!
लाल दिवा-येवला,ता.११:-तालुक्यातील कुळधर वस्ती सायगाव जिल्हा परीषद शाळेत बालआनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मेळाव्याचे उद्घाटन शालेय समिती उपाध्यक्ष विनायक जेजुरकर यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच रूपाली उशीर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उल्हास उशीर उपस्थित होते
विद्यार्थ्यांनमध्ये व्यवहार ज्ञान व गणितीय संकल्पना दृढ व्हावी या उद्देशाने बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी भाजीपाला, खेळणी, प्लास्टिक भांडी, पाणीपुरी, भेळ फरसाण, पाव-वडे ,चॉकलेट, शालेय वस्तूसह दररोजच्या वापरातील वस्तू आठवडे बाजार शाळेच्या प्रांगणात भरून विक्री केली या मेळाव्यात पालकांनी उत्तम प्रकारे प्रतिसाद दिला आपल्या पाल्याला व्याव्हारीक माहिती व्हावी यासाठी पालक व ग्रामस्थांनी भाजीपाला व खाद्य पदार्थ खरेदी करून आस्वाद घेतला ,या बाजारात विद्यार्थ्यांनी तब्बल १ हजार २०० रुपयांची उलाढाल करत व्यावहारिक ज्ञान घेऊन मेळाव्याचा आनंद घेतला . यावेळी सर्व पालक माता ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मेळावा यशस्वी करण्यासाठी ज्योती कुळधर व आशा पैठणकर यांनी मेहनत घेतली