अयोध्या: मोहम्मद् रमजान यांनी स्वतः साकारले बालस्वरूप श्रीरामाचे सिंहासन….!
लाल दिवा-नाशिक,ता.२० : मकराना हे राजस्थानातील शहर संगमरवरसाठी प्रसिद्ध आहे. आता ते मोहम्मद रमजान आणि गनी मोहम्मद यांचे शहर म्हणूनही ओळखले जाऊ लागले आहे. रमजान शब्दाच्या स्पेलिंगमध्येही राम आहेत. राम मंदिराचा निकाल लागल्यानंतर मोबाईलच्या जमान्यात खूप दिवसांनी रमजान यांचा लँडलाईन फोन मोहम्मद रमजान वाजला होता. रमजान यांना हे रामलल्लाचे दुसरे बोलावणे होते. संगमरवरकार मोहम्मद गनी यांच्यासह मोहम्मद रमजान अयोध्येला निघाले… बघता बघता मंदिर उभे केले. आता रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची घटिका जवळ येऊन ठेपली आहे.
२५ वर्षापूर्वीच राम मंदिराचे काम रमजान करतील, हे ठरलेले होते. राम मंदिराचे काम फक्त आणि फक्त रमजानच करेल, असे तेव्हा स्वतः रमजान हे विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिका-यांसमक्ष म्हणाले होते आणि २५ वर्षांनी घडलेही तसेच संगमरवराचे एकुणातील काम गनो मोहम्मद यांनी पाहिले; पण मार्गदर्शक म्हणूनही रमजान यांची भूमिका या रामकायांत मोलाची ठरली. रामलल्लाचा विशेष लळा म्हणून रामलल्लाचे सिंहासन पूर्णपणे त्यांनी स्वतः तयार केले.
गर्भगृहाच्या भव्य भिंती, छत, दरवाजे, फरशी, पायऱ्या रमजान यांच्या कारागिरीने दिव्य बनल्या आहेत. सुमारे २५ वर्षापूर्वी विश्व हिंदू परिषदेचे लोक रमजान यांचे वडील सेठ बहुद्दीन यांच्याकडे आले होते. बहुद्दीन आणि त्यांचे चिरंजीव मोहम्मद रमजान यांच्याकलेने ही मंडळी
तेव्हा थक्क झाली होती. तेव्हा रमजान यांनी अयोध्या दौराही केला होता आणि रमजाननेच रामलल्लाचे काम करायचे असे ठरले होते. मंदिराचे, सिंहासनाचे डिझाईन गोपनीय राहायला हवे, हा करार मंदिर तीर्थ ट्रस्ट व मोहम्मद रमजान यांच्यात झाला होता. रमजान यांनी तो २५ वर्षे तंतोतंत पाळला. मंदिराची कोणतीही रचना किंवा नकाशा लीक होणार नाही, चोरीला जाणार नाही याची आम्ही
डोळ्यात तेल घालून काळजी घेतली, असे मोहम्मद रमजान सांगतात.