जेजुरकर व मंडलिक वधू-वरांना नाशिकचे माजी पालकमंत्र्यांकडून शुभ आशीर्वाद !
लाल दिवा, ता. ७ : श्री मधुकर शंकर जेजुरकर यांचे नातु ,श्री.बाळकृष्ण जेजुरकर यांचे सुपुत्र चि.राहुल व श्री.संजय मंडलिक यांची कन्या चि.सौ.कां.सुप्रिया यांचा विवाह आज नाशिक येथे पार पडला.
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ हे विवाहास उपस्थित होते. यावेळी भुजबळ यांनी नवविवाहित दाम्पत्यास शुभेच्छा दिल्या व त्यांच्या भावी वाटचालीस सदिच्छा दिल्या.
यावेळी जेजुरकर,मंडलिक कुटुंबीय, परमपूज्य माधवगिरी महाराज, आमदार राहुल ढिकले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस दिलीप खैरे, डॉ.शेफाली भुजबळ,अंबादास खैरे, भुवनेश्वरी भुजबळ, समाधान जेजुरकर यावेळेस उपस्थित होते.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1