त्रंबकेश्वर येथील अल्पवयीन मुलीवर अतीप्रसंग करणा-या नराधमास जन्मठेपेची शिक्षा…
लाल दिवा: दिनांक १३/१२/२०२३ रोजी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश क. १ श्रीमती मृदूला भाटीया साो. यांचे न्यायालयात हरसुल पोलीस ठाणे गुरनं २१/२०१८ भादवि कलम ३७६,३६३, ४५२,५०४, ५०६ सह लहान मुलांचे लैंगिक अत्याचार अधिनियम २०१२ चे कलम ४ व ८ प्रमाणे दाखल खटल्याची सुनावणी पूर्ण होवून सदर गुन्हयातील आरोपी नामे रमेश चंदर पागी, वय ४८, रा. बाफन विहीर, ता. त्रंबकेश्वर याचेविरुध्द आरोप सिध्द झाल्याने मा. न्यायालयाने सदर आरोपीतास भादवि कलम ३७६ व लहान मुलांचे लैंगिक अत्यावार अधिनियम २०१२ चे कलम ६ खाली जन्मठेपेची (मरेपर्यंत) शिक्षा व १०,०००/- रू. दंड याप्रमाणे शिक्षा सुनावली आहे.
सदरची पटना दि. ०१ मार्च २०१८ रोजी रात्रौ २२:०० वा. चे दरम्यान त्रंबकेश्वर तालुक्यातील बाफन विहीर शिवारात घडली होती. सदर गुन्हयातील आरोपी नामे रमेश चंदर पागी याने यातील पिडीत अल्पवयीन मुलगी दय १४ वर्षे २ महिने हिस तिचे घरात घुसून, तिचे तोंड दाबून, तिस घरातुन पळवून नेवून दमदाटी शिवीगाळ करून तिवेवर बळजबरीने बलात्कार केला होता. सदर गुन्हयातील आरोपोस हरसुल पोलीसांनी अटक केली होती.
सदर गुन्हयाचा तपास हरसुल पोलीस ठाणेस नेमणूकीस असलेले तत्कालीन सहा. पोलीस निरीक्षक श्री. पी.पी.साळुंखे यांनी केला होता. त्यांनी आरोपीविरूध्द भक्कम पुरावे गोळा करून मा. सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. सदर खटल्यात सरकारी अभियोक्ता श्रीमती रेश्मा जाधव यांनी, तसेच पैरवी अधिकारी म्हणुन पोहवा श्री. गणेश वराडे यांनी काम पाहीले असून यातील आरोपीविरुध्द गुन्हा शाबीत झाला आहे.
सदर गुन्हयातील तपास पथकाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी तपासी अंमलदार सपोनि श्री. पी. पी. साळुंखे यांना ५०००/- रू., तर कोर्ट पैरवी अधिकारी पोहवा/गणेश वराडे यांना २०००/- रू. असे बक्षिस घोषित करून त्यांचे अभिनंदन केले आहे.