हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेलेल्या महिलेची अस्मिता लुटली, पतीलाही मारहाण! नाशिकरोडमध्ये सुरक्षितता कुठे?
नाशिकरोड हॉस्पिटलमध्ये महिलेचा विनयभंग, पतीलाही मारहाण
लाल दिवा-नाशिकरोड,दि.११:-बिटको हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या एका महिलेचा विनयभंग करण्यात आला असून तिच्या पतीलाही मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दि. ९ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी महिला बिटको हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना एक अनोळखी इसम तिच्या वॉर्डच्या दरवाजासमोर चकरा मारू लागला. तो सारखा तिच्याकडे पाहून डोळे मारत होता. त्यानंतर तो तिच्या बेडजवळ येऊन बसला आणि “तु जेवण केले का? तुला जेवण करायचे आहे का?” असे विचारू लागला. त्यामुळे महिलेला लज्जा वाटली.
महिलेच्या पतीने या इसमाला अशा प्रकारे छेडछाड का करतोस असे विचारताच त्याने महिलेला आणि तिच्या पतीला हाताने मारहाण केली.
या घटनेनंतर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक बिडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खैरे हे पुढील तपास करत आहेत.