अश्विनीच्या जिद्दिने नाशिक पोलिसांची मान उंचावली …. पोलीस आयुंकाकडून शाबासकीची थाप…… !

नाशिक, ता. १४ :- दोन वर्षांपूर्वी कझाकस्तान येथील आयर्न मॅन स्पर्धेत नाशिक पोलिस दलाचे नाव कोरल्यानंतर धावपटू अश्विनी देवरे यांनी दक्षिण आफ्रिकेतील ‘द कॉम्रेड्स मॅरेथॉन’ ही ९० किमी धावण्याची स्पर्धा अत्यंत खडतर व प्रतिकूल वातावरणात यशस्वीरीत्या पूर्ण करीत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. देशभरातील पोलिस दलामध्ये अश्विनी देवरे या अशी कामगिरीची नोंद करणाऱ्या एकमेव महिला पोलिस कर्मचारी ठरल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेत ९० किलोमीटर धावण्याची द कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा सोमवारी (ता. १०) पार पडली. नाशिक शहर पोलिस दलामध्ये महिला हवालदार असलेल्या अश्विनी देवरे यांनी गेल्या जानेवारी महिन्यापासून या स्पर्धेची तयारी सुरू केली होती. अथक परिश्रम घेतल्यानंतर त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील या स्पर्धेत सहभाग घेतला. ९० किमी अंतर धावण्याच्या या स्पर्धेमध्ये अश्विनी देवरे यांनी ११ तास ४८ सेंकदामध्ये हे अंतर यशस्वीरीत्या पार केले आहे.

 

अश्विनी देवरे यांनी या स्पर्धेचे ठिकाण आणि तेथील वातावरण थंड असल्याने नाशिकमध्ये रात्रीच्या वेळी धावण्याचा सराव केला. त्यासाठी त्यांनी नाशिक ते त्र्यंबकेश्वर, नाशिक ते सिन्नर, नाशिक ते देवळाली कॅम्प व परिसरात रात्रीच्या वेळी धावण्याचा सराव केला. रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत त्या धावण्याचा सराव एकट्याने करीत होत्या. विशेषतःः यासाठी त्यांना पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचे प्रोत्साहन मिळाले होते. यामुळे त्यांना ‘द कॉम्रेड्स मॅरेथॉन’ या स्पर्धेत नाशिकचे नाव उंचावता आले.

 

 

नाशिक: स्पर्धा पूर्ण केल्यावर भारतीय तिरंगा आणि महाराष्ट्र पोलिस दलाचा ध्वज झळकावताना धावपटू व महिला हवालदार अश्विनी देवरे….!

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!