अरुणा मुगूटराव यांनी साकारलेले कारागृह उपमहानिरीक्षणलयाचे उद्घाटन अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते होणार….!
लाल दिवा : मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेस अनुसरून शासन निर्णयाव्दारे कारागृह विभागाच्या मध्य विभाग, औरंगाबाद या प्रादेशिक कार्यालयाचे विभाजन करून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह, धुळे, नंदुरबार, जळगाव, भुसावळ, अहमदनगर ही जिल्हा कारागृहे, विसापुर खुले जिल्हा कारागृह व किशोर सुधारालय, नाशिक या संस्थांच्या समावेशासह नाशिक येथे नविन प्रादेशिक कार्यालय निर्माण करण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. तसेच कारागृह मुख्यालय, पुणे येथील कारागृह उपमहानिरीक्षक हे पद नाशिक येथील स्वतंत्र प्रादेशिक कार्यालयासाठी वर्ग करण्यात आले आहे.
त्यानुसार संदर्भ क्र. २ येथे नमूद पत्राव्दारे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी केलेल्या विनंतीस अनुसरून कारागृह उपमहानिरीक्षक यांचे कार्यालय, नाशिक विभाग, नाशिक या कार्यालयाचे कार्यालय प्रमुख घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
कारागृह उपमहानिरीक्षक, नाशिक विभाग, नाशिक यांना कारागृह विभागांतर्गत नव्याने निर्माण केलेल्या कारागृह उपमहानिरीक्षक, नाशिक विभाग यांचे कार्यालय, नाशिक या प्रादेशिक कार्यालयाचे कार्यालय प्रमुख आणि आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. तसेच नाशिक प्रादेशिक विभागाचे विभाग प्रमुख म्हणून घोषित करण्यात येत आहे.
२. कारागृह उपमहानिरीक्षक, नाशिक विभाग यांचे कार्यालय, नाशिक या प्रादेशिक कार्यालयासाठी सोबतच्या परिशिष्टातील पदे वर्ग करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
३. कारागृह उपमहानिरीक्षक, नाशिक विभाग यांचे कार्यालय, नाशिक हे प्रादेशिक कार्यालय कार्यान्वित करण्यासाठी येणारा खर्च मागणी क्र. बी-५, मुख्य लेखाशिर्ष २०५६ (तुरूंग) (००) (००) (००१), संचालन व प्रशासन (००) (०१) कारागृह निरीक्षणालय, (२०५६ ००२६) या लेखाशिर्षाखाली मंजूर केलेल्या तरतूदीतू
- शुभहस्ते *
मा. श्री. अमिताभ गुप्ता (भा.पो.से) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे
* प्रमुख उपस्थिती *
श्री.यु.टी. पवार कारागृह उपमहानिरीक्षक, नाशिक विभाग.
नाशिक
आपले विनीत
श्रीमती अरुणा मुगूटराव
अधिक्षक नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह, नाशिक