माजी सैनिकांनी पदभरतीसाठी आवेदन पत्र सादर करावे :- ले. कमांडर ओंकार कापले….!
लाल दिवा-नाशिक,ता.१४: आर्मी पब्लिक स्कुल, देवळाली येथे बिगर शिक्षक कर्मचाऱ्यांची पदभरती माजीसैनिक संवर्गातून करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिकांनी आवेदन पत्र 20 डिसेंबर 2023 पर्यंत पोस्टाने अथवा प्रत्यक्ष आर्मी पब्लिक स्कूल, देवळाली येथे सादर करावे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले (निवृत्त) यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
आर्मी पब्लिक स्कूल, देवळाली येथे बिगर शिक्षक पदभरतीसाठी www.apsdevlali.in या संकेतस्थळावरून अर्ज डाऊनलोड करून 100 रुपयांचा डिमांड ड्राफ्ट व शैक्षणिक पात्रता, अनुभव प्रमाणपत्र, स्कोअर कार्ड, आधारकार्ड इत्यादी कागदपत्रांच्या साक्षांकित छायांकित प्रती प्राचार्य, आर्मी पब्लिक स्कूल, देवळाली हॅम्पडन लाईन, देवळाली 422401 या पत्त्यावर 20 डिसेंबर 2023 पर्यंत पोस्टाने अथवा प्रत्यक्ष सादर करावे. अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा नवीन उमेदवारांसाठी 40 वर्षांपेक्षा कमी वय, अनुभवी उमेदवारास 57 वर्षे वयापर्यंत (मागील 10 वर्षांत कमीत कमी 5 वर्षांचा अनुभव असावा.) तसेच सर्व पदांसाठी इंग्रजी व संगणक साक्षरता अनिवार्य आहे. शॉर्ट लिस्टेड उमेदवरांनाच मुलाखतीस बोलवण्यात येणार असून मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना दैनिक व प्रवास भत्ता देय राहणार नाही, असे ही ले. कमांडर श्री. कापले यांनी कळविले आहे.
- अशी आहेत पद व त्यांची शैक्षणिक पात्रता…
• वरिष्ठ लिपिक : पदवीधर, लिपिक संवर्गातील माजी सैनिक (JCO/OR), वयोमर्यादा 55 वर्षांपर्यंत, कार्यालयीन व्यवस्थापनातील 5-10 वर्ष कामाचा अनुभव, अकाऊंटींग हाताळणे, वरिष्ठ लिपीक कामात उच्च प्रविणता व संगणक जाणकार
• ग्रंथपाल : ग्रंथपाल पदवीधर/मान्यताप्राप्त संस्थेतून लायब्ररीमधील डिप्लोमा संगणक साक्षर व कमीत कमी 3 वर्षांचा अनुभव
• संगणक प्रयोगशाळा तंत्रज्ञ : किमान 12 वी पास, एक वर्षाचा संगणक शास्त्रातील डिप्लोमा तसेच हार्डवेअर व नेटवर्कचे ज्ञान असावे
• लिपिक : वाणिज्य पदवीधर, संगणकातील (MS Office) चे ज्ञान असलेले, 10 वर्षे लिपीक संवर्गातील अनुभव असलेले माजी सैनिक
• प्रयोगशाळा सेवक : विज्ञान शाखेतील पदवीधर (जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र) आणि संगणक साक्षर असावा