माजी सैनिकांनी पेंशन, इसीएचएस व सीएसडी कँटीन विषयी….अडचणींबाबत 15 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन….!

लाल दिवा-नाशिक,ता.१० :- रक्षा लेखा प्रधान नियंत्रण कार्यालय, अलाहाबाद आणि दक्षिणी कमान, पुणे यांच्यामार्फत जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक वीरमाता, वीरपत्नी, विधवा यांच्या पेंशन, इसीएचएस (ECHS) व कँटीन याविषयीच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी फेब्रुवारी 2024 च्या दुसऱ्या आठवड्यात पुणे येथे पेंशन अदालत घेण्याचे नियोजित आहे. त्याअनुषंगाने ज्या माजी सैनिकांच्या अडचणी असतील त्यांनी सर्व कागदपत्रांसह 15 जानेवारीपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नाशिक येथे प्रत्यक्ष अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कमांडर ओंकार कापले (निवृत्त) यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!