पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान योजनेसाठी 4 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन…
लाल दिवा-नाशिक,ता.२२:-दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्यादृष्टीने हरित उर्जेवर चालणा-या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याबाबत योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मर्या. यांचे स्तरावरुन सुरू आहे. या योजनेकरिता दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी 4 जानेवारी, 2024 रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अशी माहिती मंडळाचे जिल्हा व्यवस्थापक संतोष शिंदे यांनी दिली आहे.
या योजनेचा उद्देश हा दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे. दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे. सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना परिवार/कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे असा आहे. या योजनेचा लाभ गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदार नावनोंदणी (अर्ज) करण्यासाठी पोर्टल दिनांक 3 डिसेंबर, 2023 रोजी प्रक्षेपित करण्यात आले असून दिव्यांग व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागविणेसाठी ही लिंक . https://evehicleform.mshtdc.co.in. उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तरी या योजनेचा लाभ अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्री. शिंदे यांनी केले आहेत……