नाशिक जिल्ह्यातील ट्रक चालकांनी कामावर तत्काळ रुजू होत सहकार्य करावे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे आवाहन….!
लाल दिवा-नाशिक,ता.९:-ट्रक चालकांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारने दखल घेतली असून चालकांनी तत्काळ कामावर रुजू होत जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.
केंद्र सरकारने भारतीय न्याय संहिता कलम 106 (2) अन्वये 10 वर्षे तुरुंगवास आणि दंडबाबतच्या तरतुदीबाबत ट्रकचालकांच्या चिंतेची दखल घेतली आहे. याबाबत ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली आहे.
नवे कायदे आणि तरतुदी अद्याप अंमलात आलेल्या नाहीत हे सरकारच्या निदर्शनास आणून द्यायचे आहे. भारतीय न्याय संहिता कलम 106 (2) लागू करण्याचा निर्णय ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसशी सल्लामसलत केल्यानंतरच घेतला जाईल. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व ट्रक चालकांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी केले आहे