खंडणी विरोधी पथकाची कामगिरी. अंबड पो. स्टे. च्या रेकॉर्डवरील हद्दपार आरोपी खंडणी पथकाच्या ताब्यात…!
लाल दिवा -नाशिक,दि.३ : अंबड पोलीस स्टेशन येथे क्रिमिनल अॅमेडमेन्ट अॅक्ट १९३२ चे कलम ७ भा. ह. का कलम ४ / २५ या गुन्हयातील हद्दपार इसम वैभव रणजित लोखंडे हा शुभम पार्क, भोळे मंगल कार्यालय, नाशिक येथे येणार असल्याची खात्रीशिर बातमी गुप्त बातमीदारा मार्फत खंडणी विरोधी पथकातील पोलीस अंमलदार २५०९ चारूदत्त निकम व पोलीस अंमलदार ४९७ भूषण सोनवणे यांना मिळाली होती.
त्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावुन हद्दपार आरोपी वैभव रणजित लोखंडे, वय २० वर्षे, रा. रिगल अष्टविनायक बिल्डींग, ३ रा माळा, रूम नंबर १५, महालक्ष्मी नगर, अंबड, |नाशिक यास शुभम पार्क, भोळे मंगल कार्यालय, नाशिक येथुन शिताफीने ताब्यात घेवुन त्यास पुढील तपास व कारवाई कामी अंबड पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगीरी मा. श्री. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त सो. नाशिक, मा.श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त सो. गुन्हे, मा. श्री. डॉ. सिताराम कोल्हे, सपोआ गुन्हे, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी | पथकातील पोनि. विदयासागर श्रीमनवार, सपोनि. प्रविण सूर्यवंशी, श्रेपोउनि. दिलीप भोई, सपोउनि. दिलीप सगळे, पो.ना. योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर पो. अंमलदार भुषण सोनवणे, गंगेश जगझाप, चारूदत्त निकम, विठ्ठल चव्हाण व मपोशि. सविता कदम यांनी केलेली आहे.