मुंढेगाव शिवारातील कुरियर व्हॅनवरील दरोडयात आणखी ६०० ग्रॅम सोने व ३० किलो चांदी हस्तगत आरोपींचे वाहनावरील चालकास चांदवड येथून अटक…!

लाल दिवा-नाशिक,ता.३०:-दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी मध्यरात्रीचे सुमारास मुंबई येथील जय बजरंग कुरियर सर्दीसच्या मारुती इको व्हॅनवर मुंढेगाव शिवारात अज्ञात पाच ते सहा आरोपींनी धाडसी दरोडा टाकून साडेचार किलो सोन्याचे दागिने व बिस्किटे, १३५ किलो चांदीचे दागिने व चांदीच्या विटा असा एकूण (०३ कोटी ६७ लाख ५५ हजार) रूपये किंमतीचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला होता. सदर घटनेबाबत घोटी पोलीस ठाणे येथे गुरनं ३५/२०२४ भादंवि कलम ३९५, ३४१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

सदर गुन्हयाचे तपासात स्थानिक गुन्हे शाखा व घोटी पोलीस ठाणेकडील पथकांनी अहोरात्र मेहनत घेवून आग्रा जिल्हयातील खेरागड व इटौरा परिसरातून आरोपी नामे १) देवेंद्रसिंग उर्फ करवा सतवीर परमार, २) आकाश रामप्रकाश परमार, ३) हुबसिंग मुल्लासिंग ठाकुर (माजी सैनिक), ४) शिवसिंग बिजेंद्रसिंग ठाकुर (फळ व्यापारी), ५) जहिर खान सुखा खान (माजी सैनिक) यांना ताब्यात घेवून वरील गुन्हयात अटक केली होती. यातील अटक आरोपींनी त्यांचे साथीदारांसह वरील गुन्हा केल्याची कबुली दिली होती, त्यात त्यांचे कब्जातून वरील गुन्हयात दरोडा टाकून चोरून नेलेले २.५ किलो सोन्याचे दागिने व ४५ किलो चांदीचे दागिने असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता.

 

नमुद गुन्हयातील अटक आरोपींना मा. न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांची ०९ दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली होती. दरम्यान घोटी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास तपासकामी आग्रा येथे रवाना करण्यात आले होते. यातील अटक आरोपीतांकडे सदर गुन्हयाचे तपासात केलेल्या चौकशी अंती, पोलीस पथकास आग्रा येथुन ५९६ ग्रॅम सोने व २९.७४६ किलो चांदीचे दागिने हस्तगत करण्यात यश आले आहे. तसेच आरोपीतांनी सदर गुन्हयात वापरलेल्या वाहनावरील चालक नंदकिशोर पंढरीनाथ गारे, वय ४५, रा. बहादुरी, ता. चांदवड, जि. नाशिक यास देखील नमुद गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

 

सदर गुन्हयात अद्याप पावेतो ३ किलो ९५ ग्रॅम सोने व ७५ किलो ५२३ ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण ०२ कोटी ६० लाख ६६ हजार १९६ रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून यातील उर्वरीत आरोपी व मुद्देमालाचा पोलीस पथक कसोशिने शोध घेत आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद पाटील यांचे पथक करीत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!