मा. शरद पवार साहेबांसाठी दोन शब्द मनातले : अनिता महेश भामरे, भाजप
लाल दिवा, ता. ३ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेबांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचे घोषित केले आणि देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. खरंतर ह्या राजीनाम्या विषयी मी काही आपले मत मांडावे इतकी मोठी नाही तरी देखील मी सुध्दा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तेवीस वर्ष, आठ महिने काम केले आहे म्हणून तो माझा नक्कीच अधिकार आहे अशी भावना भाजप मध्ये प्रवेश केलेल्या आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेल्या अनिता भामरे यांनी बोलून दाखवली.
साहेबांविषयी बोलायचेच झाले तर आज साहेब ८३ वर्षाचें आहेत. किती दिवस साहेबांनी समाजासाठी आणि पक्षासाठी काम करायचे हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्तीला नक्कीच सतावत होता. आजपर्यंत साहेबांनी कार्यकर्त्यांना खूप काही दिले आहे. काही कार्यकर्ते आमच्यासारखे दुर्दैवी ज्यांना काही मिळाले नसेल. असो तो आता इतिहास झाला…..
साहेबांच्या आजच्या निर्णयाने मला नक्कीच आनंद झाला. एक महिला म्हणून सांगायचेच झाले तर प्रतिभा काकुंसोबत आणि नातवंडासोबत उर्वरित आयुष्य साहेबांना जगतांना पाहणे मला नक्कीच आवडेल. शेवटी जन्म एकदाच मिळतो हे कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे. आज साहेब मनाने जरी तरी तरूण असले तरी शरीराने थकले आहेत हे नाकारून चालणार नाही. त्यामुळे साहेबांना कुटुंब, नातेवाईक आणि मित्रांसोबत उरलेले आयुष्य जगू द्या. त्यांचा अधिकार हिरावू नका. साहेबांविषयी दोन शब्द मनातले साहेब आपण शतायुषी व्हा.