कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीत निमंत्रित निवडीसाठी इच्छापत्र सादर करावे ….अनिसा तडवी .. !
लाल दिवा – नाशिक, ता: १२ जिल्ह्यात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यतेस चालना देण्यासाठी
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समिती’ स्थापन करण्यात आली आहे.
या समितीत निमंत्रित म्हणून निवड करण्यासाठी जिल्ह्यातील कला, विज्ञान, सामाजिक कार्य या क्षेत्रातील नामांकित व्यक्ती, विषय तज्ज्ञ यांनी इच्छापत्र 15 मे 2023 पर्यंत सादर करावे, असे आवाहन सदस्य सचिव तथा कौशल्य, रोजगार, उद्योजकता सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांनी केले आहे.
वरीलप्रमाणे नामांकित व्यक्ती आणि विषय तज्ज्ञ यांनी आपले इच्छापत्र संस्थेच्या नाममुद्रित पत्रावरील सहमतीसह सदस्य सचिव तथा सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रगत व्यवसाय प्रशिक्षण पद्धती इमारत, पहिला मजला, शासकीय औद्योगिक संस्था परिसर, त्र्यंबकरोड, सातपूर नाशिक 422007 या पत्त्यावर अथवा कार्यालयाच्या nashikrojgar@gmail.com ई-मेल आयडीवर 15 मे 2023 पर्यंत सादर करावे ,असेही सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांनी कळविले आहे.