अंबड गुन्हे शोध पथकाची उत्कृष्ठ कामगिरी ; जबरी चोरी करणारे आरोपी केले जेरबंद….!
लाल दिवा : पोलीस आयुक्त संदिप कर्णिक नाशिक शहर, पोलीस उप आयुक्त परिमंडळ – २ मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी गुन्हे उघडकिस आणण्यासाठी अंबड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकुर यांना सुचना व मार्गदर्शन केले होते. त्याप्रमाणे अंबड पोलीस स्टेशन ने खालील गुन्हे उघड किस आणले आहे.
अंबड पोलीस ठाणेकडील गुरनं ३०२/२०२४ ( दि. ४) मे २०२४ रोजी दाखल गुन्हयातील फिर्यादी नामे अरूण जगन्नाथ पाटील, वय. ५४ वर्ष, व्यवसाय – सेवानिवृत्त, रा. जि. जळगाव यांनी तक्रार दिली की, (दि.०३ )मे २०२४ रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास फिर्यादी यांनी त्यांचे मेव्हणे राहत असलेल्या पियुष बंगला, सदगुरूनगर, अंबड नाशिक यांचे घरासमोर फिर्यादी हे त्यांचे मुलीशी फोनवर बोलत असतांना अनोळखी मोटार सायकलवर आलेल्या तीन इसमापैकी दोन इसमांनी फिर्यादीजवळ येवुन पत्ता विचारण्याचे बहाण्याने त्यातील एकाने फिर्यादीचे हातातील वरील वर्णनाचा मोबाईल फोन बळजबरीने हिसकावण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादीने त्यांना प्रतिकार केला असता दोधांनी फिर्यादीस तोंडावर बुक्या मारून खाली पाडुन फिर्यादीस जखमी करून फिर्यादीचे हातातील मोबाईल हिसकावुन त्यांचे साथीदाराचे मोटर सायकलवर बसुन तेथुन पळुन गेले फिर्यादी यांचे तक्रारीवरून मोबाईल फोन बळजबरीने हिसकावुन घेतल्याची जबरी चोरीचा गुन्हा हा अंबड पोलीस ठाणे, नाशिक येथे दाखल करण्यात आला होता. अंबड पोलीस ठाणे, नाशिक कडील गुन्हे शोध पथक हे गुन्हयातील तपास करित असतांना पोशि समाधान शिंदे यांना गोपनिय माहिती मिळाली त्यावरून गुन्हे शोध पथकाने आरोपी नामे
- १) शमशाद करीम अन्सारी, वय २० वर्ष रा. औदुंबर बस स्टॉप, नाशिक
- २) राजन सुंदर कनोजीया, वय २० वर्ष रा. सिडको, नाशिक
- ३) हासीम हारून खान वय २३ वर्ष, अंबड, नाशिक यांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडुन रेड मी कंपनीचा ५,००० रू किंमतीचा मोबाईल फोन व एक होंडा कंपनीची स्प्लेंडर ५०,०००- किंमतीची मोटर सायकल हा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन नमुद आरोपीतांना (दि.१३) मे२०२४ पावेतो मा. न्यायालयाने पोलीस कोठडी सुनविण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक नाशिक शहर पोलीस उप आयुक्त परिमंडळ – २ श्रीमती मोनिका राऊत सहा पोलीस आयुक्त शेखर देशमुख, अंबड विभाग तसेच अंबड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकुर व पो.नि. सुनिल पवार (गुन्हे) यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी स.पो.नि.के.टी. सेंदळे व पोउनि पाडवी तसेच गुन्हे शोध पथकाचे अंमलदार परदेशी, सचिन करंजे, समाधान शिंदे, तुषार मते, अनिल गाढवे, प्रविण राठोड, दिपक निकम, राकेश पाटील, गणेश झनकर यांनी केला असुन गुन्हयाचा पुढील तपास पोउनि पाडवी हे करीत आहेत.