अवैध धंदे चालकांची गय केली जाणार नाही,माझ्यावरील आरोप राजकीय हेतूने प्रेरित– – दादाजी भुसे, पालकमंत्री नाशिक…!
लाल दिवा- नाशिक,दि.११: आज जे घाणेरडे आरोप माझ्यावर केले आहेत ते पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित आहेत. सुषमाजी अंधारे यांनी जे आरोप केलेत ते सिद्ध करावेत अन्यथा मालेगावच्या जनतेची माफी मागावी असे झाले नाही तर कायदेशी कारवाई करू. ड्रग्स बाबत काही दिवसापूर्वी माहिती मागवली होती त्यानुसार शहरात पोलिस कारवाई होत आहे. काहीवेळा बाहेरील टीम बोलवून कारवाई करावी लागते. याचा अर्थ स्थानिक पोलिसांवर विश्वास नाही अस होत नाही. येत्या काही दिवसात अजून अवैध धंद्यांवर कठोर कारवाई होईल. अवैध धंदा चालकांना पाठीशी घातले जाणार नाही. तो कुठल्याही पक्षाचा असो अथवा कुणीही असो त्याच्यावर काठोरातील कठोर कारवाई करण्यात येईल. येत्या काही दिवसात विशेष पथकांच्या माध्यमातून इतर अवैध धंद्यांवर देखील टाच आणली जाईल. –दादाजी भुसे, पालकमंत्री नाशिक