२० कोटीं न दिल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणाऱ्या…… स्वामी समर्थ केद्राच्या उपासीके विरुद्ध ……..अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपिठाच्या विश्वताने केला……खंडणीचा गुन्हा दाखल… ! महिलेस तीन दिवसांची पोलीस कोठडी…!
लाल दिवा -नाशिक,१९ : फिर्यादी निंबा मोतीराम शिरसाट यांचे फिर्यादी वरून रोख १० लाख रूपये खंडणी स्विकातांना आरोपी महिला सारीका उर्फ सारीखा बापुराव सोनवणे हिस तिचा मुलगा मोहित बापुराव सोनवणे वय-२५ यांचेसह अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी श्री. निंबा मोतीराम शिरसाट, वय-५४ व्यवसाय शेती, मुळ राह. देवळा तालुका येथील रहिवाशी असुन सध्या गंगापुर रोड येथे वास्तव्यास आहेत. ते सन-१९९१ पासुन दिंडोरी येथील स्वामी समर्थ अध्यामिक सेवा केंद्रात धार्मीक कार्यक्रमात सक्रिय सहभागी असल्याने त्यांची अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ हया न्यासाच्या विश्वत मंडळावर कार्यकारी सदस्य म्हणुन नेमणुक करण्यात आलेली आहे.
आरोपी सारीका उर्फ सारीखा बापुराव सोनवणे वय ४२ हया कृषी विभागात अधिकारी पदावर कार्यरत असुन त्या स्वामी समर्थ केंद्मच्या उपासीका आहेत. सन-२०१४-१५ मध्ये आरोपी यांचेवर सिडको परीसरातील ब-याच केंद्राच्या व्यवस्थापनाची जबाबदारी होती. फिर्यादी व आरोपी यांचे प्रशांत नगर पाथर्डी फाटा येथे जाणे-येणे असल्याने त्यांची तेथे ओळख झाली होती. फिर्यादी व आरोपी दोघे ही देवळा परीसरातील रहिवाशी असल्याने आरोपी यांनी फिर्यादी यांना कसमादे परीसरातील स्वामी समर्थ केंद्राची जबाबदारी घेण्यास विनंती केली. यानुसार फिर्यादी यांनी त्यांना कसमादे परीसरात ४० ते ४५ सेवा केंद्राची जबाबदारी दिली.
सन-२०१८-१९ दरम्यान आरोपी यांनी पतीचे निधन, आजारपण, शेती तसेच लहान मुलांची जबाबदारी इत्यादी कारण सांगुन फिर्यादी कडुन २५ लाख रू. उसणवार घेतले.
तसेच सन-२०१८-१९ मध्ये आरोपी सारीका उर्फ सारीखा बापुराव सोनवणे यांनी स्वतःच्या आर्थीक फायदयाकरीता सकल्प सिध्दी नावाची कपंनी पैसे डबल करून देते असे अमिष दाखवुन सेवेक-याकडुन रकमा जमा केल्या परंतु परत केल्या नाहीत. अश्या तकारी प्राप्त झाल्या. सेवेक-यांच्या रकमा परत करण्यासाठी, आरोपी यांनी फिर्यादी यांना वेळोवेळी पैश्याची मागणी केली. आरोपीस मदत म्हणुन फिर्यादी यांनी रु २० लाखाची मदत स्व कमाईतुन केली.
जानेवारी – २०२२ मध्ये आरोपी व तिचा मुलगा यांनी फिर्यादी यांना गंगापुर रोड येथे। समक्ष बोलावून धमकाविले की, माझा मुलगा आयटी एक्सपर्ट असुन आम्हास पैसे न दिल्यास तुमचे मॉर्फ डिडीओ करून व्हायरल करू. त्यानंतर वेळोवेळी व्हॉटसअप कॉल करून पैसे मागण्यास सुरूवात केली.
जानेवारी २०२३ मध्ये आरोपी यांनी फिर्यादी यांना प्रशांत नगर स्वामी समर्थ केंद्रात भेटुन आरोपीचे मोबाईल मधील व्हिडीओ फिर्यादी यांना दाखवुन मोबाईल परत घेतला व २० कोटी रू.ची मागणी केली अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.
फिर्यादी यांनी घाबरून उयणवारीतुन ५० लाख रू.जमवुन आरोपी यांना जेहान सर्कल गंगापुर रोड नाशिक याठिकाणी गाडी मध्ये नोव्हेबर २०२३ मध्ये दिले. त्यावेळी आरोपी यांनी मोबाईल मधील व्हिडीओ डिलीट केल्याचे दाखविले.
परंतु पुन्हा आरोपी यांनी १०, कोटी ५० लाख रू.ची मागणी करून रकम न दिल्यास
बलात्कारांचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली तसेच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
दिली. फिर्यादी यांनी कंटाळुन पोलीसाकडे तक्रार दाखल केली असता पोलीसांनी सापळा रचुन आरोपी महिला व तिचा मुलगा मोहीत बापुराव सोनवणे यास १० लाख रू. रोख स्विकारतांना जेहान सर्कल गंगापुर रोड नाशिक येथुन रंगेहाथ अटक केली आहे. आरोपी यांचे घरातुन १० लाख रू. रोख, १ लॅपटॉप, ३ अॅपल फोन जप्त करण्यात आले आहेत. आरोपी यांनी फिर्यादी कडुन आजपर्यत १ कोटी ५ लाख रू. घेतलेले आहेत.
- याबाबत गंगापुर पोलीस स्टेशन येथे गुरनं २८०/२०२३ भादवि कलम ३८४,३८८,३८९,५०६, ३४ सह माहिती व तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (सी), ६६(ई),६७,६७(ए) अन्वये दि.१८/११/२०२३ रोजी दाखल करण्यात आलेला आहे. यागुन्हयात आरोपी महिला व तिचा मुलगा मोहीत बापुराव सोनवणे यांना अटक करण्यात आलेली आहे.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती तृप्ती सोनवणे,पो. नि. श्रीमानवार सा.पो. नि. सूर्यवंशी पो ना भुषण सोनवणे पो. शि.चव्हान पो. शि.जाधव तसेच खंडणी विरोधी पथक यांचे सहायाने करीत आहेत.