नाशिक लोकसभेसाठी अजित पवार गटाची बैठक अरिंगळे करणार शक्ती प्रदर्शन…..!

लाल दिवा-नाशिक,ता .४ :-नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा अजित पवार गटाला सोडावी यासाठी मुंबईत उद्या ५ मार्च रोजी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे यासाठी इच्छुकांनी लॉबिंग करायला सुरुवात केली आहे. अजित पवार गटाकडून लढण्यासाठी इच्छा असणारे अजित पवार गटाचे उमेदवार निवृत्ती अरिंगळे आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईत शक्ती प्रदर्शन करणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

 

 

लोकसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार, खा. प्रफुल पटेल व अन्य जेष्ठ मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक लोकसभा मतदारसंघ निहाय आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. महिला विकास मंडळ, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, मंत्रालयाजवळ, नरिमन पॉइंट, मुंबई -२१ येथे दुपारी २.३० वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी लोकसभेच्या इच्छुकांना बोलवण्यात आलेले असून निवृत्ती

अरिंगळे आणि कार्यकर्ते या ठिकाणी अजित दादांना नाशिकची जागा सोडण्यासाठी साकडे घालणार आहेत. अरिंगळे यांनी यासाठी कार्यकर्त्यांचा फौज फाटा एक दिवस अगोदरच मुंबईला रवाना केला आहे.

लोकसभा मतदारसंघातील आजी-माजी खासदार आमदार, प्रदेश पदाधिकारी, फ्रंटल सेलचे राज्य प्रमुख, फ्रंटल व सेलचे जिल्हाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी व सहकार क्षेत्रातील मान्यवर यांना निमंत्रित करून अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत नाशिक लोकसभा मतदारसंघाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!