अहमदनगर: गर्दीतून दुचाकी चोरणाऱ्या हद्दपार गुन्हेगोरास अटक, २१ दुचाकी जप्त…!

लाल दिवा-अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातून लग्न समारंभ, सभा, मंदिर अशा गर्दीच्या ठिकाणांवरून दुचाकी चोरणाऱ्या हद्दपार गुन्हेगोरास नगर तालुका पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीकडून २१ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

दि. १५ जुलै २०२४ रोजी गणेश मंगल कार्यालय, नगर, दौंड रोड, हिवरे झरे येथून तुकाराम बबन शिंदे यांची होंडा शाईन कंपनीची दुचाकी चोरीला गेली होती. याप्रकरणी १६ जुलै रोजी नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ५९१/२०२४ अंतर्गत भादंवि कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

या गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल द्वारके हे करीत असताना पोलीस निरीक्षक श्री. प्रल्हाद गीते यांना गुप्तहेरांमार्फत सदर गुन्ह्यातील दुचाकी किशोर जयसिंग पटारे याने चोरल्याची माहिती मिळाली. तसेच तो सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया चौक, अहमदनगर येथे येणार असल्याचेही कळाले. या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

पोलिसांनी विचारले असता आरोपीने त्याचे नाव किशोर जयसिंग पटारे, रा. महादेव मंदिर जवळ, पिंपळगाव माळवी, ता. नगर, जि. अहमदनगर, हल्ली रा. द्वारका मंगल कार्यालय जवळ, वडगाव गुप्ता, ता. नगर, जि. अहमदनगर असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने नगर तालुका पोलीस स्टेशनमधील गुन्हा रजिस्टर क्रमांक ५९१/२०२४ अंतर्गत भादंवि कलम ३७९ नुसार दाखल गुन्ह्याची कबुली दिली. 

आरोपीने अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातून अनेक दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्याने चोरी केलेल्या दुचाकी त्याच्या नातेवाईक आणि मित्रांकडे लपवून ठेवल्याची माहिती दिली. पोलिसांनी आरोपीने दिलेल्या माहितीवरून वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून एकूण २१ दुचाकी जप्त केल्या आहेत.

आरोपी किशोर जयसिंग पटारे याच्यावर अहमदनगर शहरातील एमआयडीसी, तोफखाना, राहुरी पोलीस स्टेशनमध्ये दुचाकी चोरीचे १० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. 

या कारवाईत नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. प्रल्हाद गीते, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय हिंगडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल शाहीद शेख, राहुल द्वारके, नितीन शिंदे, राहुल थोरात, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी बोराडे, राजू खेडकर, सागर मिसाळ तसेच दक्षिण मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू यांचा समावेश होता.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!