आसाराम बापू…. राम रहीम नंतर….आता नाशिक मधील धर्मगुरूचा…. अश्लील व्हिडिओ हाती लागल्याने एकच खळबळ……!
लाल दिवा : आसाराम बापू, राम रहीम यांच्यानंतर आता नाशिक मधील धर्मगुरूंनी त्यांच्याच एका विधवा सेवेकरीला लग्नाचे आमिष दाखवून कशाप्रकारे सतत नऊ वर्ष लैंगिक शोषण केले आहे. याचा दस्तर खुद्द व्हिडिओच “लाल दिव्या”च्या हाती लागला असून त्या “बाबा”चे कारनामे आता संपूर्ण जगासमोर येणार असल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर “बाबा”ला वाचण्यासाठी राजकारणातील मोठे मासे ॲक्टिव्ह झाल्याचेही बोलले जात आहे.
नाशिक मधील एक केंद्र असलेले गुरुपीठाचे पीठाधीश यांनी एका विधवा महिला सेवेकरीला लग्नाचे आमिष दाखवून कशाप्रकारे वेळोवेळी बलात्कार करून शारीरिक छळ केला आहे. याचा व्हिडिओ “लाल दिव्या”च्या हाती लागल्याने संपूर्ण राज्यातसह देश विदेशात एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून या केंद्रा द्वारे अक्षरशः बाजार मांडलाय तो या बाबाने. त्यांच्यावर श्रद्धा ठेवून अनेक सेवेकरी त्यांना अक्षरशः देव मानायचे. परंतु यांचा खरा चेहरा परदा फाश केला तो त्यांच्याच एका महिला सेवेकरीने. आपल्यावर बलात्कार केल्याचा अर्ज त्यांनी सुरुवातीला नाशिक मधील एका पोलीस ठाण्यामध्ये दाखल केला होता. परंतु त्यांच्या अर्जाचा विचार तर झाला नाहीच उलट त्या महिलेवर पिठाच्याच एका विश्वस्ताने खंडणीचा गुन्हा दाखल करून त्यांना मध्यवर्ती कारागृहाची हवा खाऊ घातली. एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये त्या महिलेवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले. एवढेच नव्हे तर त्या महिलेच्या मुलाला व भावाला देखील अटक करण्यात आली. त्यानंतर खऱ्या अर्थाने या प्रकरणाची वाच्यता सर्वदूर पसरण्यास सुरुवात झाली.
दरम्यान महिलेला सोडवण्यासाठी तिच्या वडिलांनी ठिकठिकाणी मदतीची याचना देखील केली. परंतु त्यांना मदत करण्यास कोणीच हिंमत दाखवत नसल्याचे दिसून आले. अखेर त्यांनी एका हिंदु सामाजिक कार्यकर्त्याशी संवाद साधला. मुलीला मदत करण्यास या सामाजिक कार्यकर्त्याची काही हरकत नाही असे लिहून दिले. असे सांगून त्यांनी त्यांना लेखी पत्र देखील दिले. या हिंदुत्ववादी सामाजिक कार्यकर्त्यांने वारंवार या घटनेचा बुरखा पडण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर उपोषणाला बसण्याचा देखील इशारा दिला. त्यांच्या या इशारा नंतर इशाऱ्या नतर अवघ्या काही दिवसातच त्या पीडित महिलेची जेलमधून सुटका करावी लागली. अखेर घाबरलेल्या महिलेने बाहेर आल्यानंतर सदर प्रकरणाबाबत वाच्यता करण्याचे माञ धाडस केले नाही. त्यामुळे तिच्यावर कोणीतरी लक्ष ठेवून घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. असे स्पष्ट दिसू लागले.
आजही त्या महिलेला न्याय मिळावा व तिच्यावर अन्याय अत्याचार करणाऱ्या धर्मगुरूंचा पर्दाफाश व्हावा यासाठी हिंदु सामाजिक कार्यकर्ते प्रयत्नांची पराकाष्टा करताना दिसत आहे. सुरुवातला सदर महिला बाबांना फसवत असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे तिने केलेला दावा हा सपशेल खोटा असल्याचे सेवेकरीमध्ये बोलले जात होते. परंतु या घटनेच्या मुळापर्यंत गेलेल्यांना आता यश आले आहे. धर्मगुरूंनी त्या महिलेचे लैंगिक शोषण केले आहे. अशा प्रकारचा व्हिडिओच आता जगासमोर येत असल्याने ; त्या धर्मगुरूंचा आता परदा फाश झाला असून त्यांचा लवकरच आसाराम बापू व राम रहीम होणार असल्याचे बोलले जात आहे.
सदर व्हिडिओ हा नाशिक मधील तारवाला नगरच्या एका फ्लॅट मधील आहे. सदर भोंदू बाबा ने महिलेला मंगळसूत्र घालून लग्नाचे आमिष देखील दिले होते. एवढेच नव्हे तर या बाबाने अनेक सेवेकरी महिलांना आपल्या हवसची शिकार केल्याचेही त्या महिलेचे म्हणणे आहे. ..
.