आडगाव शिवारात अवैध दारू विक्री करणारे खंडणी विरोधी पथकाचे ताब्यात ; खंडणी विरोधी पथकाची दमदार कामगिरी…!

लाल दिवा-नाशिक,ता.८:पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे साो, नाशिक शहर यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयातील अवैद्य दारू विक्री करणारे इसमांवर कारवाई करण्या बाबत मार्गदर्शनपर सुचना दिलेल्या होत्या.

त्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, नाशिक शहर कडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे कसोशीने अवैद्य दारू विक्री करणारे इसमांचा शोध घेत होते. आज दिनांक ०७/११/२०२३ रोजी हॉटेल अपना ढाबा, १० मैल, आडगांव शिवार, मुंबई आग्रा रोड नाशिक येथे इसम नामे १) शंकर कुमार उमेश राम वय २२ वर्षे, धंदा- मॅनेजर | राह- गुलाब धावडे यांच्या घरात भाडेतत्वार, आडगाव, मनपा शाळा जवळ, आडगाव नाशिक | मुळ गाव- मखमिल पुर, ता-कपरी, ठाणे. करपी, जि- अरवल राज्य – बिहार २) भवन अरविंद सिंग वय ३४ वर्षे, धंदा- हॉटेल अपना ढाबा चालक/मालक, राह- हॉटेल अपना ढाबा, १० वा मैल आडगाव, नाशिक, मुंबई-आग्रा रोड, नाशिक यांनी दोघांनी आपले स्वतःचे | फायदयासाठी विनापरवाना बेकायदा वर नमुद देशी व विदेशी कंपनीची दारू व अंगझडती ची | रोख रक्कम अशी एकुण किं.रु.९३३७/- रू. चा प्रोव्हिशन गुन्हयाचा माल विक्री करण्याचे | उददेशाने आपले स्वतःचे कब्जात बाळगतांना मिळुन आले असून त्यांना मुद्देमालासह पुढील तपास व कारवाई कामी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आडगाव पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.


  • सदरची कामगीरी मा. श्री. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त सो. नाशिक, मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, सो. गुन्हे व विशा., मा. श्री. डॉ. सिताराम कोल्हे सो, सपोआ, गुन्हे., पो. नि. व्ही. डी. श्रीमनवार, खंडणी विरोधी पथक, सपोनि. प्रविण सुर्यवंशी, | यांचे मार्गदर्शनाखाली श्रेणी पोउनि दिलीप भोई, पोह १०६ किशोर रोकडे, पोह ७२२ राजेश भदाणे, पोना ९११ दत्तात्रय चकोर, पोना ४९७ भुषण सोनवणे, पोशि २३८९ भगवान | जाधव, पोशि. २५०९ चारूदत्त निकम, पोशि. २२१८ विठ्ठल चव्हाण व मपोशि ८१० सविता कदम यांनी केलेली आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!