आचारसंहिता लागण्याच्या एक दिवस आधीच ….. मराठा योद्धा जरांगे पाटील भुजबळ फार्म परिसरात….. चर्चेला उधाण…. कार्यकर्ते व पोलिसांचा मोठा फौज फाटा…!
लाल दिवा : ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ व मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारे जरांगे पाटील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक चकमकी होताना दिसत आहे. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षण आरक्षणासाठी आवाज उठविला आहे. तर मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसीतून आरक्षण देणार नाही असे ठामपणे सांगितले आहे.
त्यांचे शाब्दिक युद्ध संपूर्ण महाराष्ट्राने बघितले. असे असताना आचारसंहिता लागण्याच्या एक दिवस आधीच अचानक भयानक शुक्रवारी रात्री जरांगे पाटील भुजबळ फार्म परिसरात आल्याची चर्चा पदाधिकाऱ्यांना समजताच त्यांच्या भुवया उंचावल्या
आणि अचानक त्या ठिकाणी गर्दी होऊ लागली. त्यावेळी समजले की विलास पांगरकर यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी जरांगे पाटील आले आहेत. हे समजल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. यावेळी पोलिसांचा मोठा फौज फाटा होता. तर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.