एकाच दुकानात दोनदा चोरी करणारा सराईत गुन्हेगार धुळ्यातील साथीदारा सह जेरबंद
सातपूरला ‘चोरी’चा डबल धमाका! गुन्हेशाखेच्या मुत्सद्देगिरीने ‘गुप्त’ जाळे आणि ‘अंत’ पर्यंतचा थरार!
गुन्हेशाखा युनिट क्र. १ ची कारवाई
नाशिक: सातपूर येथील प्रगती टेक्सटाईल या होलसेल कपडे विक्रीच्या दुकानात २९ सप्टेंबर २०२४ आणि १३ ऑक्टोबर २०२४ रोजी दोनदा घरफोडी झाली होती. यामध्ये रोख रक्कम आणि मोबाईल फोन चोरीला गेले होते. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. २५०/२०२४ आणि गुन्हा क्र. २६४/२०२४ नोंद करण्यात आले होते.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या गुन्ह्यांचा तपास लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र. १ चे अधिकारी आणि अंमलदार या गुन्ह्यांचा समांतर तपास करीत होते.
पोलीस हवालदार महेश साळुंके आणि पोलीस अंमलदार राहुल पालखेड़े यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि पोलीस अंमलदार आप्पा पानवळ यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, या गुन्ह्यात धुळ्यातील सराईत गुन्हेगार १) गणेश उर्फ अजय आसाराम कोळी आणि २) नवनाथ भानुदास कोकाटे (दोघेही राहणार सातपूर, नाशिक) यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
या माहितीच्या आधारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार महेश साळुंके, पोलीस अंमलदार आप्पा पानवळ, मुक्तार शेख, राहुल पालखेडे, नितीन जगताप, राम बर्डे, पोलीस हवालदार देविदास ठाकरे, योगीराज गायकवाड, शरद सोनवणे आणि जगेश्वर बोरसे यांनी गोल्फ क्लब येथे सापळा रचला. यावेळी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली यामाहा आर १५ मोटारसायकल आणि चोरीला गेलेला मोबाईल फोन असा एकूण १,६०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या गुन्ह्याचा पुढील तपास सातपूर पोलीस ठाणे करीत आहे..