मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते होणार सक्षम समीक्षा त्रैमासिकाच्या लेखक विचारवंत प्रा.हरी नरके साहित्य विशेषांकाचे प्रकाशन…!_

  • रविवार,दि.२१ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता भुजबळ फार्म कार्यालय नाशिक येथे होणार प्रकाशन सोहळा

 

  • प्रकाशन सोहळ्यास नरके कुटुंबियांसह विविध क्षेत्रातील मान्यवर राहणार उपस्थित

 

लाल दिवा-नाशिक,दि.१९ जानेवारी :- शब्दाली प्रकाशन अंतर्गत प्रकाशित होणाऱ्या व प्रा.डॉ.शैलेश त्रिभुवन यांनी संपादित केलेल्या सक्षम समीक्षा त्रैमासिकाच्या लेखक, विचारवंत प्रा.हरी नरके यांच्या साहित्य विशेषांकाचे प्रकाशन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते रविवार दि.२१ जानेवारी २०२४ रोजी भुजबळ फार्म नाशिक येथील कार्यालयात करण्यात येणार आहे, अशी माहिती संपादक प्रा.डॉ.शैलेश त्रिभुवन व प्रकाशिका सौ.सुनिता त्रिभुवन यांनी दिली आहे.

 

शब्दाली प्रकाशन वारजे पुणे यांच्या कडून गेल्या १३ वर्षांपासून सक्षम समीक्षा हे त्रैमासिक नियमित प्रकाशित होत आहे. त्यांच्या वतीने ऑक्टोबर – नोव्हेबर – डिसेंबर – २०२३ या सक्षम समीक्षा त्रैमासिकाच्या प्रा.हरी नरके साहित्य विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येत आहे. रविवार, दि. २१ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ५ वा राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भुजबळ फार्म कार्यालय, नवीन नाशिक येथे होणार आहे. या प्रकाशन सोहळ्यास प्रा.हरी नरके यांच्या पत्नी श्रीमती संगीता नरके व कन्या कु.प्रमिती नरके यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहे. या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संपादक प्रा.डॉ.शैलेश त्रिभुवन व प्रकाशिका सौ.सुनिता त्रिभुवन यांनी केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!