कैद्याच्या कलेला प्रोत्साहन, पर्यावरणाचेही रक्षण : राज्यपालांकडून मातीच्या गणरायाचे कृत्रिम तलावात विसर्जन !
लाल दिवा-मुंबई,दि१३ -: पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांच्या निवासस्थानी स्थापित केलेल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्तीचे बुधवारी (११ सप्टेंबर) राजभवनातील कृत्रिम तलावात विसर्जन केले. विशेष म्हणजे, ही मातीची गणेशमूर्ती नाशिक कारागृहातील कैद्याने बनवली होती आणि नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कार्णिक यांनी राज्यपालांना भेट दिली होती.
https://x.com/maha_governor/status/1834136156990308795?t=HMrirFuwaZHoaEy24KBtuA&s=19
कैद्यांमधील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तांनी केलेल्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी राज्यपालांनी कुटुंबियांसह, राजभवनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह गणरायाची आरती करून निरोप दिला. समुद्राच्या पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी राज्यपालांनी मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, संयुक्त सचिव श्वेता सिंगल, नियंत्रक जितेंद्र वाघ आणि इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.https://x.com/maha_governor/status/1834136156990308795?t=HMrirFuwaZHoaEy24KBtuA&s=19