नाशिकमध्ये सहकारी पतसंस्थेचा डल्ला; कोट्यवधींची फसवणूक, गुंतवणूकदारांवर गंडा!

लाल दिवा नाशिक: शहरातील राजस्थानी मल्टिस्टेट को.ऑप. क्रेडिट सोसायटी लि. या संस्थेतर्फे गुंतवणूकदारांना आकर्षक योजने दाखवून कोट्यवधींची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

फिर्यादी प्रदीप मधुकर वाघ (वय 49, रा. अजिंक्य व्हिलेज, मटाले गार्डन, शिवशक्ती नगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी संस्थेने गुंतवणूकदारांना करंट व स्मार्ट सेव्हींग खात्यांवर ६ टक्के, एक लाख रुपयांच्या सरासरी शिल्लकीवर ८ टक्के, आरडींवर १२ टक्के आणि १३ महिन्यांच्या ठेवीवर दरमहा १००० रुपये अशा आकर्षक योजना सांगून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. सुरुवातीला काही रक्कम परत करून विश्वास संपादन केल्यानंतर गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम घेण्यात आली. मात्र, नंतर ठरल्याप्रमाणे रक्कम परत न करता फसवणूक करण्यात आली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीसह अनेक गुंतवणूकदारांची एकूण १,५१,६७,८५३ रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी भादंवि कलम ४२०, ४०६, ४०९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!