महिलेची छेडछाड केल्याप्रकरणी इसमाला अटक….!

लाल दिवा-नाशिक,दि.३१:- म्हसरूळ येथील एका महिलेची छेडछाड केल्याप्रकरणी पोलिसांनी एका इसमाला अटक केली आहे. पवन पुरुषोत्तम रामराजे (वय ३५, रा. बोरगड, म्हसरूळ) असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. 

 

दि. ३० ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी १:३० वाजता फिर्यादी महिला आपल्या कामावर असताना आरोपीने त्यांना अश्लील शिवीगाळ केली. तसेच “तुझे भावास टॅव्हलचे बिजनेस मधून काढून टाक” अशी धमकी देत त्यांना जमिनीवर पाडले आणि छातीवर हात लावून दाबला. यामुळे फिर्यादी महिलेला मानसिक त्रास झाला. 

 

याप्रकरणी फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३३३, ७४, ७६, ११५(२), ३५३, ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलीसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी पवन रामराजे याला अटक केली. सध्या पोउपनि/मनोहर क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!