रेकॉर्ड वरील गुन्हेगार व तडीपार गुन्हेगार यांचे कडुन ०२ देशी पिस्तोल….०३ जिवंत काडतुसे जप्त गुन्हे शाखा युनिट-१ ची कामगिरी…..!

लाल दिवा : संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, संदिप मिटके, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांनी नाशिक शहरामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आणि हत्यार बाळगणा-या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करणे बाबत सुचना दिलेल्या होत्या व त्याप्रमाणे मार्गदर्शन केले होते.

 

( दि,०५) जुन रोजी गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील नेमणुकीचे पोना विशाल देवरे अशांना गुप्त बातमीदार याचे मार्फतीने बातमी मिळाली की, रेकॉर्ड वरील गुन्हेगार मुज्जफर उर्फ मज्जु मैनौद्दीन शेख हा भोई गल्ली, कथडा नाशिक येथे गावठी बनावटीचे पिस्तोल (कटटा) घेवुन फिरत असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली होती. सदरची माहीती पोना विशाल देवरे यांनी वपोनि मधुकर कड यांना कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली श्रेणी पोउनि रविंद्र बागुल, पोलीस हवालदार प्रविण वाघमारे, प्रदिप म्हसदे, शरद सोनवणे, विशाल काठे, संदिप भांड, नाझीमखान पठाण व समाधान पवार अशांनी भोईगल्ली कथडा रोडवर, नाशिक येथे सदर इसमास शिताफीने पकडुन ताब्यात घेतले. सदर इसमाचे नांव मुज्जफर उर्फ मज्जु मैनौद्दीन शेख, वय-४२वर्षे, रा-भोई गल्ली कथडा भद्रकाली नाशिक असे असल्याचे समजल्यावरून त्याचेकडुन ३०, हजार रुपये कि.चे देशी बनावटीचे पिस्तोल, ०१ जिवंत काडतुसे ५०० रूपये कि.चे असे हस्तगत करण्यात आले आहे.

 

तसेच तडीपार इसम नामे आवेश उर्फ अव्वा निसार शेख हा शासनाची परवानगी न घेता चौकमंडई भद्रकाली नाशिक येथे गावठी बनावटीचे पिस्तोल (कटटा) घेवुन फिरत असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली होती. सदरची माहीती पोलीस नाईक विशाल देवरे यांनी वपोनि मधुकर कड यांना कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली श्रेणी पोउनि रविंद्र बागुल, पोलीस हवालदार प्रविण वाघमारे, प्रदिप म्हसदे, शरद सोनवणे, विशाल काठे, संदिप भांड, नाझीमखान पठाण व समाधान पवार अशांनी भोईगल्ली कथडा रोडवर, नाशिक येथे सदर इसमास शिताफीने पकडुन ताब्यात घेतले. सदर इसमाचे नांव आवेश उर्फ अव्वा निसार शेख, वय-२३वर्षे, रा-चौक मंडई भद्रकाली नाशिक असे असल्याचे समजल्यावरून त्याचेकडुन ३०, हजार रुपये कि.चे देशी बनावटीचे पिस्तोल, ०२ जिवंत काडतुसे १ हजार -रूपये कि. चे असे हस्तगत करण्यात आले आहे.

 

सदरच्या दोन्ही इसमाकडुन ०२ गावठी बनावटीचे पिस्तोल (कट्टा) तसेच ०३ जिवंत राउंड असा एकुण ६१, हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन दोघां इसमाविरूध्द भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आले 

 

सदरची कामगीरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक., प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, संदिप मिटके, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील पोलीस निरीक्षक मधुकर कड, सपोनि हॅमत तोडकर, श्रेणी पोउनि रविंद्र बागुल, प्रविण वाघमारे, प्रदिप म्हसदे, विशाल काठे, संदिप भांड, शरद सोनवणे, विशाल देवरे, चापोहवा नाझीमखान पठाण, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी अशांनी केलेली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!