भाग दोन (२) :…… श्री समर्थ गुरुपीठाच्या प्रकरणासंदर्भात…… पीडीतेच्या वडिलांनी घेतलेली गजू घोडके यांची भेट…..!
लाल दिवा -नाशिक,ता.३०:- गेल्या काही महिन्यांपूर्वी श्री स्वामी समर्थ गुरु पिठच्या विश्वस्ताने आपल्याला एका व्हिडिओचे माध्यमातून एक महिला ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप करत तिला खंडणीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती.
यानंतर सदर प्रकरणाची वाच्यता संपूर्ण महाराष्ट्रात झाली. त्यानंतर सदर पीडित महिला व तिच्या भावाला पोलिसांनी अटक करून मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली होती.
तीन ते चार ठिकाणी तिच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. ती महिला, भाऊ व मुलगा अशा तिघांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणामागे काय काय घडले या संदर्भाची चर्चा विविध अंगांनी चर्चिली गेली. एका पिडीतेवर कसा अन्याय होत आहे.
तीला मदत व्हावी अशी याचना घेऊन त्या पिडीतिच्या वडीलानी सामाजिक कार्यकर्ते गजू घोडके यांची भेट घेतली. मुली बाबत वडिलांची कैफियत ऐकून गजू घोडके यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. त्यावर त्यांनी तुमच्या मुलीला शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही न्याय मिळण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
त्यानुसार त्यांनी पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील दिले होते. एवढेच नव्हे तर पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दाखल केला होता. परंतु याकडे सबशेल दुर्लक्ष करण्यात आले. पिडीतेच्या वडिलांबरोबर झालेल्या भेटीत गजू घोडके यांनी काय सांगितले ? ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास दाखवण्यात येत आहे. …….(उद्याच्या तिसऱ्या भागात पिडीतेच्या वडिलांनी मोरे यांच्यावर केलेल्या खळबळजनक आरोपाचा होणार खुलासा)…