नाशिक रोडला पोलीस आयुक्तांचा नागरिकांशी साधला सुसंवाद….. नागरिकांनी सांगितल्या आपल्या समस्या… आयुक्तांचा उपक्रमांची नागरिकांनी केली प्रशंशा…

लाल दिवा : नागरिकांशी सुसंवाद वाढून नागरिकांचे प्रश्न समजावे समस्या मार्गदर्शन सूचना दुहेरी संवाद व्हावा या उद्देशाने नाशिक पोलीस आयुक्तांनी विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जॉगिंग ट्रॅकवर नागरिकांचा पोलीस आयुक्तांशी संवाद आयोजित केला आहे नाशिक रोड येथील मुक्ती धाम मागील मनपा 125 शाळेच्या मैदानावर हा संवाद आयोजित करण्यात आला होता. रविवारी सकाळी साडेसात वाजता या संवादात अनेक नागरिकांनी आपल्या समस्या आणि प्रश्न मांडले. नागरिकांच्या प्रश्नांना पोलीस आयुक्तांनी समर्पक उत्तरे दिली.

शाळा व कॉलेज परिसरात अवतीभवती फिरणारे दादा भाई यांचा शहर पोलिसांनी बंदोबस्त करावा, तारुण्यात प्रवेश केलेले मुलं मुली मैदानांवर अश्लील हावभाव करत असतात सामान्यांना फिरणे मुश्किल होते, परिसरात पोलिसांची साध्या वेशात गस्त असावी म्हणजे शिस्त अबाधित राहील, कर्णकर कशा आवाज करणारे सायरन वर नियंत्रण आणावे, बिटको पासून तर थेट उपनगर पर्यंत रोजच वाहतूक कोंडी होते यावर तोडगा काढावा, रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग वाढवावी गस्त वाढवावी, रेल्वे स्टेशनच्या बाहेर अनेक टवाळखोर फिरत असतात त्यांच्यावर नियंत्रण आणावे रात्रीच्या वेळी परिसरात ग्रस्त वाढवावी म्हणजे संभाव्य घरफोडीच्या घटना होणार नाही. यासारख्या सूचना मांडल्या. ज्येष्ठ नागरिकांनी सायबर फ्रॉड पासून वाचावे म्हणून सजग राहणे आवश्यक आहे. यावेळी परिमंडल दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत ,उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके व पोलिस अधिकारी अंमलदार कर्मचारी उपस्थित होते कुठल्याही समस्या किंवा अडचणी असतील तर 9923323311 या व्हाट्सअप क्रमांकावर पोलिसांना लेखी तक्रार करू शकता.

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!