भाग पहिला (१)…….श्री समर्थ गुरुपीठाच्या पिठाधिशांनी “त्या” प्रकरणाचा खुलासा करावा…….गजू घोडके
लाल दिवा : लोकसभा निवडणुकीच्या एन रणधुमाळीत सामाजिक कार्यकर्ते गजू घोडके यांनी श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या एका संचालकाने त्या महिलेवरील खंडणी प्रकरणासंदर्भात गुरुपीठाच्या पिठाधिशांनी खुलासा करावा अशी मागणी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी पंचवटी पोलीस ठाणे येथे एका पिडीत महिलेने आपल्यावर झालेल्या अन्याय अत्याचारा संदर्भात तक्रार अर्ज दाखल केला होता.
परंतु त्या अर्जावर कुठल्याही प्रकारची तात्काळ कारवाई करण्यात आली नाही. त्याच्या काही दिवसानंतर त्या महिलेला खंडणीच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली.
या संदर्भात स्वामी समर्थ गुरु पिठाच्या एका संचालकांने महिले विरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर त्या महीलेची सेंट्रल जेलमध्ये रवानगी करण्यात आली होती. दोन ते तीन पोलीस ठाण्यात सदर पिडीत महिला व तिचा भाऊ यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.
त्यानंतर सदर प्रकरणाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा होऊ लागली होती. कथित व्हिडिओ संदर्भात बहुतांश जणांनी यावर खमंग चर्चा केली. तर काहींनी हा व्हिडिओ आम्ही स्वतः बघितला आहे. अशीही चर्चा केली. दिसते ते प्रकरण सोपं नसून यामागे राजकीय हात असल्याचेही बोलले गेले. तर काहींनी या प्रकरणामागील करता करविता वेगळाच आहे. असेही बोलले जात आहे. या प्रकारात कालांतराने एखाद्याचा आसाराम बापू देखील होऊ शकतो. असेही बोलले गेले. तर काहींनी या प्रकरणात थेट दिल्लीश्वरांचा हात असल्याचे सांगत आहे.
याच दरम्यान पीडित महिलेच्या वडिलांनी सामाजिक कार्यकर्ते गजू घोडके यांची भेट घेऊन माझ्या मुलीवर खूप अन्याय होत असून तिला न्याय द्यावा. अशी विनवणी केली. त्यानंतर या संदर्भात गजू घोडके यांनी थेट पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन या प्रकरणा संदर्भात चौकशी व्हावी अशी मागणी केली. दरम्यान पोलीस उपायुक्त यांनी गजू घोडके यांना या संदर्भात बोलावून जाब जबाब देखील घेतला. तर भद्रकाली पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी देखील या संदर्भात गजू घोडके यांच्याकडे चौकशी केली. त्यानंतर सदर महिलेची मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली. भीतीच्या सावटाखाली असलेल्या त्या महिलेने मात्र या संदर्भात भितीपोटी बोलणे टाळल्याचे दिसून आले. परंतु सदर प्रकरणाची नागरिकांमध्ये व स्वामी समर्थ भक्तांमध्ये होत असलेल्या तथाकथित चर्चे बाबत नक्की खुलासा व्हावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गजू घोडके यांनी केली आहे. स्वामी समर्थ पिठाचे पिठाधिष आता यावर काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एन लोकसभा निवडणुकीत सदर प्रकरण उकरले गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणा संदर्भात पोलिसांशी संवाद साधणारा तो मध्यस्थी कोण ? अशी देखील चर्चा या निमित्ताने होत आहे…