राजकीय पार्श्वभूमी असणाऱ्या वैभव देवरेवर अखेर खंडणीचा गुन्हा दाखल….!

लाल दिवा : घेतलेल्या कर्जाची व्याजासह परतफेड
करूनही एका इसमाला घरी बोलावून, तसेच वारंवार फोन करून त्याच्याकडून बेकायदेशीररीत्या बारा लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्याविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी विजय भालचंद्र खानकरी (वय 50, रा. मुरलीधर हाईट्स, गोविंदनगर, नाशिक) हे सप्टेंबर 2023 मध्ये आजारी पडले होते. त्यादरम्यान औषधोपचारासाठी त्यांना पैशांची गरज होती. त्यावेळी त्यांनी आरोपी वैभव यादवराव देवरे (रा. सीमा पार्क अपार्टमेंट, चेतनानगर, नाशिक) याच्याकडून तीन लाख रुपयांची रक्कम व्याजाने घेतली होती.
 
दरमहा 10 टक्के दराने व्याज देण्याचे ठरले. फिर्यादी खानकरी यांनी घेतलेल्या तीन लाख रुपयांच्या कर्जापोटी मुद्दल व व्याज अशी एकूण 4 लाख 47 हजार रुपयांच्या रकमेची परतफेड केली होती. कर्ज घेतेवेळी खानकरी यांनी व्याजाने घेतलेल्या पैशापोटी सिक्युरिटी म्हणून आरोपी वैभव देवरे याला एक कोरा धनादेश दिला होता.
 
पैशांची परतफेड केल्यानंतर खानकरी हे वैभव देवरे यांच्याकडे सिक्युरिटी म्हणून दिलेला धनादेश परत मागण्यासाठी गेले होते; मात्र देवरे याने हा धनादेश परत न करता उलट फिर्यादी खानकरी यांना दमबाजी व अश्लिल शिवीगाळ करीत कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी देत 12 लाख रुपयांची खंडणी मागितली.
 
हा प्रकार दि. 5 डिसेंबर 2023 ते दि. 10 एप्रिल 2024 या कालावधीत चेतनानगर येथे घडला. कर्जाची व्याजासह परतफेड करूनही देवरे याच्याकडून वारंवार केल्या जाणाऱ्या खंडणीच्या मागणीला कंटाळून फिर्यादी खानकरी यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात आरोपी वैभव देवरेविरुद्ध तक्रार दिली. वैभव देवरे याला पोलिसांनी काल रात्री अटक केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हुंदे करीत आहेत.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!