उपनगर हद्दीत निर्माण झालेल्या दंगल सुदृश्य परिस्थितीवर….. नाशिक पोलीस आयुक्तांनी अवघ्या एका तासात नियंत्रण आणल्याने त्यांच्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव……!
लाल दिवा : सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट व्हायरल केल्याने संतप्त झालेल्या व धार्मिक भावना दुखावलेल्या नागरिकांनी उपनगर पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. यामुळे येथे दंगल सुदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. संतप्त झालेल्या नागरिकांनी वाहनांवर दगडफेक केली होती. यादरम्यान अनिकेत शास्त्री यांच्या वाहनांवर देखील दगडफेक करण्यात आली. अनिकेत शास्त्री यांनी यापूर्वी आपल्याला सुरक्षा मिळावी. यासाठी नाशिक पोलीस उपायुक्त यांच्याकडे मागणी केली होती. आता त्यांच्या गाडीवर झालेल्या हल्यानंतर आता तरी नाशिक पोलीस त्यांना सुरक्षा पुरणार का असा प्रश्न ? उपस्थित झाला आहे. दरम्यान नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या एका तासांमध्ये या दंगल सुदृश्य परिस्थितीवर नियंत्रण आणण्यात त्यांना यश आले आहे. नागरिकांनी कुठल्या प्रकारे सोशल मीडियावर चुकीचे संदेश बाहेर करू नये असे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे. नाशिक पोलिसांच्या या कामगिरी बाबत सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. तर काही जणांना अटक केल्यामुळे संतप्त नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले आहे.
उपनगर हद्दीतील एका समाजकंटकाने सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट शेअर केल्याने काही जणांच्या भावना दुखावल्या. त्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणात रास्ता रोको करत रोष व्यक्त केला. नासिक पूना रोड रास्ता दत्त मंदिर चौक बिटको तणावपूर्ण वातावरण निर्माण झाली होती. शहरातील पोलीस रस्त्यावर येऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यात नाशिक पोलिसांना यश आले. वेळीच पोलीस प्रशासनाने त्वरित दखल घेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सूचना देत परिमंडल २ च्या मोनिका राऊत , उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल घेत दंगा नियंत्रण पथक व सर्व पोलीस अधिकारी यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. तात्काळ समाजकंटकास तपासाचे चक्र फिरवेल आरोपीस उपनगर पोलीस स्टेशन येथे अटक करून गुन्हा दाखल केला.
परिस्थिती एक तासाच्या पोलीस आयुक्तांनी नियंत्रणात आणली. पालघरची पुनरावृत्ती होता होता राहिली. महंत अनिकेत शास्त्री यांच्या वाहनावर जमावाने हल्ला करून गाडीचे तोडफोड केली. महंत अनिकेत शास्त्री थोडक्यात बचावले. पालघरची पुनरावृत्ती होते की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. वेळीच अनिकेत शास्त्री यांनी उपनगर पोलिसांची संपर्क साधून मदत मागित.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1
1