कत्तलीसाठी बेकायदेशीरपणे बांधुन ठेवलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका..!

“भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी”

नाशिक शहरात गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे व त्यांचे मांस विक्री करणारे आरोपीतांवर कडक कारवाई करणेबाबत तसेच आयुक्तालय हद्दीत दिवसा व रात्री प्रभावीपणे गस्त घालुन गोवंशीय जनावरांची कत्तल व त्यांचे मांस विक्रीस कायमचा प्रतिबंध करणेबाबत संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी सक्त आदेश दिले आहेत.

 

त्याअनुषंगाने किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-, सिध्देश्वर धुमाळ, सहा. पोलीस आयुक्त, सरकारवाडा विभाग, गजेंद्र पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संतोष नरूटे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), भद्रकाली पोलीस ठाणे, नाशिक शहर यांचे मार्गदर्शना नुसार गुन्हे शोध पथकाचे सपोनि सत्यवान पवार यांचे अधिपत्याखाली कार्यरत असलेले सपोउनि/यशवंत गांगुर्डे व पथक असे भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत रात्रपाळी कर्तव्यावर असतांना दि.२३ मार्च २०२४ रोजी सकाळी ०६:३० वा. चे सुमारास गुन्हे शोध पथकाचे पोलीस शिपाई नितीन भामरे यांना गुप्त बातमीदारा मार्फत कथडा सर्व्हस स्टेशन जवळ, एका पत्र्याचे शेडमध्ये गाई व वासरे हे कत्तल करण्यासाठी बांधुन ठेवले असल्याबाबत गोपनीय माहीती मिळाल्याने त्यांनी लागलीच कर्तव्यावर असलेल्या गुन्हे शोध पथकास माहीती दिली.

 

त्यानंतर लागलीच गुन्हे शोध पथकाने कथडा सर्व्हस स्टेशन जवळ, भद्रकाली, नाशिक येथे जावुन सदर ठिकाणी असलेल्या पत्र्याचे शेडची पाहणी केली असता सदर शेडमध्ये मिळालेल्या बातमीप्रमाणे ०२ गाई व ०२ वासरे बांधुन ठेवल्याची त्यांची खात्री झाली. तसेच शेडमध्ये असलेला इसम नामे कलीम सलीम शेख, वय ३२ वर्षे, रा. घर नं. ३७५१, कथडा, जुने नाशिक याचेकडे सदर जनावरांबाबत विचारपुस केली असता त्याने सदर जनावरे ही त्याची असल्याचे सांगुन सदर जनावरे बांधुन ठेवल्याचे कारणाबाबत कोणतीही समाधानकारक माहीती न दिल्याने सदर जनावरे ही त्याने कत्तलीसाठी बेकायदेशीररित्या बांधुन ठेवल्याचे निष्पन्न झाल्याने सदर जनावरे ही ताब्यात घेवुन पुढील पालन पोषणाकरीता पांजरापोळ, तपोवन, नाशिक येथे ठेवण्यात आली आहेत. तसेच इसम नामे कलीम सलीम शेख, वय ३२ वर्षे यास भद्रकाली पोलीस ठाणे येथे आणुन त्याचेविरूध्द गुन्हा रजि.नं. ९४/२०२४ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५ (अ), ९ सह प्राण्यांना कुरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस हवालदार सतिश साळुंके हे करीत आहेत.

 

सदरची कामगिरी ही संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर, किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, सिध्देश्वर धुमाळ, सहा. पोलीस आयुक्त, सरकारवाडा विभाग, नाशिक शहर, गजेंद्र पाटील पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संतोष नरूटे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), भद्रकाली पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनि सत्यवान पवार, सपोउनि यशवंत गांगुर्डे सतिष साळुंके, कय्युम सैय्यद, अविनाश जुंद्रे, नितीन भामरे, निलेश विखे, दयानंद सोनवणे अशांनी पार पाडली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!