अखेर….दहशतवादी सलीम कुत्ता डान्स प्रकरणावरून ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावार गुन्हा दाखल…. अडचणीत होणार वाढ…..!

लाल दिवा-नाशिक, ता. २८ : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्याबरोबर डान्स प्रकरणी ‘उबाठा’ गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात आडगाव पोलिस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस चौकशीतून सलीम कुत्ताबरोबर झालेली डान्स पार्टी आणि त्या पार्टीला सुधाकर बडगुजर हजर असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरोधात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे बडगुजर यांचे पाय आणखी खोलात गेले असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने ‘उबाठा’ गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

नागपूर येथे गेल्या डिसेंबर महिन्यात झालेल्या हिवाळी अधिवेशनात भाजप आमदार नीतेश राणे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात बाँबस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता आणि ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांचा नाशिकमध्ये पार्टीतील नाचतानाचा व्हिडिओ दाखविला आणि बडगुजर यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या डिसेंबर महिन्यात बडगुजर यांची शहर गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली होती. सदरील चौकशीचा अहवाल आयुक्तांना प्राप्त झाला. याप्रकरणी बडगुजर यांच्यासह सलीम कुत्ता समवेतच्या डान्स पार्टीमध्ये उपस्थित असलेल्यांविरोधात आडगाव पोलिस ठाण्यामध्ये बेकायदेशीर कृत्य केल्याचा ठपका ठेवत बडगुजर यांच्यासह सलीम कुत्ता उर्फ मोहमंद सलीम मीरा मोईद्दीन शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

  • काय आहे प्रकरण?

 

● सलीम कुत्ता हा १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी असून, जन्मठेपेची शिक्षा भोगतो आहे. २०१६ मध्ये तो नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात असताना, मेमध्ये तो पॅरोल रजेवर होता. पॅरोल रजा संपण्याच्या आदल्या रात्री तो सुधाकर बडगुजर यांच्या फार्म हाउसवर झालेल्या पार्टीत सहभागी झाला होता. या पार्टीत बडगुजर व सलीम कुत्ता हे दोघे ‘मैं हूँ डॉन…’ या गाण्यावर नाचतानाचा व्हिडिओ आमदार नीतेश राणे यांनी डिसेंबर २०२३ च्या हिवाळी अधिवेशनात दाखवून लक्षवेधी मांडली होती.

 

 

  • अडचणी वाढणार

 

दहशतवादी सलीम कुत्ता याच्यासमवेतची

डान्स पार्टी सुधाकर बडगुजर यांच्याच आडगाव हद्दीतील हिंदुस्थाननगरमधील फार्महाउसवर झाली होती. या पार्टीमध्ये सलीम कुत्ता हा मुंबई बाँबस्फोटातील आरोपी असल्याचे माहिती असूनही बडगुजर यांनी त्याची भेट घेऊन पार्टीला बोलाविले आणि भेटवस्तूही दिली होती. ती भेटवस्तू काय होती, हे जसे गुलदस्त्यात आहे तसेच ही भेट का व कशासाठी झाली याचाही उलगडा झाला नसून त्याबाबत पोलिस तपास सुरू आहे. याप्रकरणी बडगुजर यांच्यासमोरील अडचणी येत्या काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!