वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांची दमदार कामगिरी……..निलकंठेश्वर महादेव मंदिरातील मुर्ती चोरणाऱ्या चोरटयांच्या आवळल्या मुसक्या २,००,००० रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत….. महादेव भक्तांनी पोलीसांचे मानले आभार….!
लाल दिवा : दि,२१ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास निलकंठेश्वर महादेव मंदिर विश्वास नगर अशोकनगर सातपूर नाशिक या ठिकाणी अज्ञात चोरटयाने मंदिरातील महादेवाच्या पिंडीवरील पंचधातूचा मुकूट पिंडींच्या खाली लावलेले पंचधातूचे कवच पिंडीचे वरती लावलेला पंचधातूचा तांब्या तसेच मंदिरातील देवीचा पंचधातूचा मुखवटा व दानपेटीतील रोख रक्कम व मंदिरातील पुजेचे इतर साहित्य असा मुद्देमाल कोणीतरी चोरून नेला असलेबाबत डायल ११२ वर तक्ररी प्राप्त झाली होती. सदर तक्रारीचे अनुषंगाने सातपूर पोलीस स्टेशन कडील गुन्हेशोध पथकातील पोलीस हवालदार खरपडे, पोलीस अंमलदार गुंजाळ, शेजवळ, गायकवाड यांनी लागलीच घटनास्थळी भेट देवून घटनास्थळाची पहाणी केली व घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून सदर घटनेबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक. सोहन माछरे यांना अवगत केले असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून घटनास्थळाची पहाणी केली. निलकंठेश्वर मंदीरातील पंचधातुच्या मुर्ती चोरीस गेल्याचे दिसून आले. सदर घटनेच्या अनुषंगाने सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयातील आरोपीतांचा व चोरीस गेलेल्या मालाचा शोध घेण्याकरीता पोलीस आयुक्त, संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२, मोनिका राऊत, पोलीस सहाय्यक आयुक्त, अंबड विभाग, शेखर देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सातपुर पोलीस स्टेशन सोहन माछरे यांनी तात्काळ तपास सुत्रे फिरवून तपास अधिकारी पोलीस हवालदार खरपडे व गुन्हे शोध पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे व अंमलदार यांना योग्य ते मार्गदर्शन करून सुचना दिल्या. मा. वरिष्ठांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे तपासी अंमलदार पोलीस हवालदार खरपडे, पोलीस अंमलदार गुंजाळ, शेजवळ आणि गायकवाड यांचे पथकाने निलकंठेश्वर मंदिर व परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजचे अवलोकन करून उक्त गुन्हयातील आरोपीतांचा त्रंबकेश्वर तालुक्यातील बेझे, प्रिंपी, हिरडी, रोहीले येथे जाऊन शोष असतांना उक्त गुन्हयाचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात उक्त मंदिरातील चोरी करणारे आरोपीांनी पोलीस पथकास पहाताच अंधाराचा फायदा घेऊन पिंप्री गावातून पळ काढला, तपास पथकास त्यांना संशय आल्याने तपास पथकाने नमुद आरोपीतांचा पाठलाग करून त्यांना अत्यंत शिताफिने पकडले. त्यांना त्यांचे नावगाव विचारता त्यांनी त्यांची नावे १) रोशन भगवान भाडमुखे, वय २१, वर्षे, रा. मु. पो. प्रिंपी, ता. त्रंबकेश्वर जि. नाशिक, २) प्रताप दत्तु वाष, वय २४ वर्षे, रा. सदर, ३) सुनिल जयराम महाले, वय २० वर्षे, रा. हिरडी ता. त्रंबकेश्वर जि. नाशिक अशी असून त्यांनी निलकंठेश्वर मंदिरातील चोरीची कबुली दिली. त्यानंतर तपासी अंमलदार पोलीस हवालदार खरपडे यांनी तपास कौशल्यांचा वापर करून उक्त आरोपीतांकडून निलकंठेश्वर मंदिरातून चोरी करून चोरून नेलेला मुद्देमाल तसेच त्यांनी गुन्हयात वापरण्यात आलेली मोटार सायकल असा एकूण २ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.