आता तुम्हाला पोलीस आयुक्तांना भेटायची गरज नाही……. कारण तेच येत आहेत तुम्हाला भेटायला….. तेही चक्क जॉगींग ट्रॅकवर…… साधतील तुमच्याशी संवाद आणि घेणार फीडबॅक….!
लाल दिवा : नाशिक शहरात लोकांच्या राहण्याच्या ठिकाणी त्यांना आरोग्य अबाधित राखण्यासाठी विविध ठिकाणी जॉगींग ट्रॅक उपलब्ध आहेत. सदर जॉगींग ट्रकवर नागरीक मोठ्या संख्येने सकाळ व सायंकाळ अशा दोन्ही वेळी वॉकीग/जॉगींग साठी येत असतात.
पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे संकल्पनेतुन नागरीकांशी संवाद साधण्यासाठी व त्यांचे म्हणणे (फिडबॅक) जाणुन घेण्यासाठी दिनांक २४/०२/२०२४ सकाळी ०७.०० वा. पोलीस अधिकारी हे जॉगींग ट्रॅकला भेट देणार आहेत. सदर जॉगींग ट्रॅक भेटी मध्ये मा. पोलीस आयुक्त, मा. पोलीस उपआयुक्त, सहा. पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व इतर पोलीस अधिकारी, अंमलदार सहभागी होणार आहेत.
- * भेट देण्यात येणारे नाशिक शहरातील एकुण जॉगींग ट्रॅक:- ३५
- जॉगींग ट्रॅकला भेट देण्यासाठी नेमण्यात आलेले एकुण पो. अधिकारी:- ७८
- सदर जॉगींग ट्रॅकला भेट देवुन पोलीस अधिकारी नागरीकांशी संवाद साधतील व त्यांचे म्हणणे (फिडबॅक) जाणुन घेतील.
- प्रत्येक जॉगिंग ट्रॅकसाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले असुन सदरचे नोडल अधिकारी सदर परिसराचे सुरक्षा ऑडिट करून सुरक्षा संबंधी उपाय योजना सुचवून त्याप्रमाणे मनुष्यबळ पेट्रोलिंगसाठी नेमणे व इतर उपाययोजना करतील.
- सदरचे नोडल अधिकारी जॉगींग ट्रॅकला आठवडयातुन एकदा भेट देतील व नागरीकांशी वॉकमध्ये सहभागी होवुन त्यांचेशी संवाद साधतील. तसेच सुरक्षे संबंधी व पोलीसांच्या इतर कामकाजा संबंधी माहिती (फिडबॅक) घेतील.
- प्रत्येक महिण्यांतुन एकदा वरिष्ठ पोलीस अधिकारी हे जॉगींग ट्रॅकला भेट देवुन नागरीकांशी संवाद साधुन व त्यांचे म्हणणे जाणुन घेणार आहेत.
जॉगिंग ट्रॅकला भेटीचा वेळ वरील प्रमाणे आहे
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1