चार कोटी रुपयांचे दागिने लुटणाऱ्या टोळीत चक्क देशाचे रक्षण करणाऱ्या माजी लष्करी जवानाचा समावेश……नाशिक ग्रामीण पोलिसांची चमकदार कामगिरी….!
लाल दिवा-नाशिक,ता.२५ : मुंबई आग्रा महामार्गावरील माणिकखांब गावाजवळ घोटी पोलीस ठाणे हद्धीत सोने चांदीचे दागिने पोहचविणाऱ्या कुरिअर व्हॅनच्या चालकासह अन्य दोघांना लुटणाऱ्या चार जणांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धारदार हत्याराचा धाक दाखवत डोळ्यात मिरचीची पूड फेकून ४ कोटी रुपयांचे दागिने लुटणारी ही टोळी उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा येथून ताब्यात घेतली गेली आहे. या प्रकरणी तिघे जण फरार झाले असून पोलिसांचे पथक आग्रा येथे तळ ठोकून आहेत. या टोळीत माजी लष्करी जवानांचा समावेश असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. १ ते दीड कोटी रुपयांचा ऐवज जप्त केल्याचे समजते. मागील आठवड्यात ही घटना घडली होती. मुंबईच्या जय बजरंग कुरिअर सर्व्हिसेसच्या इको गाडीवर पाच सहा जणांनी दोन वेगवेगळ्या कारमध्ये येवून लूटमार केली होती. लुटलेल्या वाहनास एकाने पुढून तर एकाने मागून कार आडवी लावून वाहन अडवले होते. सर्वांना खाली उतरवून शस्त्राचा धाक दाखवत त्यांच्याकडून ४ कोटी किमतीचे दागिने लुटल्याची घटना घडली होती. कारचालक गोपालकुमार अशोककुमार रा. किरावली, आग्रा याच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. ह्या टोळीचा छडा लावल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.