पोलिसांच्या नाकावर टिच्चून पोलीस चौकीसमोरील जीममध्ये झालेला चोरीचा गुन्हा २४ तासाच्या आत उघड…… गुन्हेशाखा युनिट क. १ ची जबरदस्त कामगीरी…!
लाल दिवा-नाशिक,ता.९ : गंगापुर पोलीस स्टेशन हद्दीत शिवाजी नगर पोलीस चौकी समोरील जीम मध्ये घरफोडी चोरी झाले बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुन गंगापुर पोलीस स्टेशन येथे तकार दिल्यावरुन गुन्हा रजि. नंबर ०७/२०२४ भादवि कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा समांतर तपास गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील नेमणुकीचे पोहवा/महेश साळुंके व पोना/मिलींद परदेशी यांनी घटनास्थळाचे तात्काळ सीसीटीव्ही फुटेज पाहुन आरोपी हे सराईत असल्याची ओळख पटविली व त्या सराईत गुन्हेगारांची माहिती काढुन व त्यांचा शोध घेवुन पोहवा/महेश साळुंके व पोना/मिलींद परदेशी, पोअं/विलास चारोस्कर, नितीन जगताप, राजु राठोड, आप्पा पानवळ, मुक्तार शेख, अमोल कोष्टी यांनी सराईत आरोपी नामे १) प्रकाश राजेंद्र विसपुते, वय ३८ वर्षे, राह. आम्रपाली झोपडपट्टी उपनगर, नाशिक २) निलेश विनायक कोळेकर, वय ३४ वर्षे, राह. केशरकुंज अपार्टमेंट, जेलरोड, नाशिक यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली देवुन त्यांनी जीममधुन चोरीस केलेले एमआय फोन, लिनोओ कंपनीचा लॅपटॉप, सॅमसंग कंपनीचा ब्ल्युटुथ स्पिकर व गुन्हयामध्ये वापरलेली रिक्षा क्रमांक MH 15 FU 3651 असा एकुण १,६३,००० रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन सदर इसमांना मुद्देमालासह पुढील कारवाई कामी गंगापुर पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदर गुन्हा हा अवघ्या काही तासातच उघडकिस आणल्या बद्दल फिर्यादी हे गुन्हेशाखा युनिट ०१ कार्यालय येथे येवुन पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा शाल श्रीफळ देवुन सत्कार केला व मा. पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक साो. व गुन्हेशाखेचे अधिकारी व अंमलदार यांचे आभार व्यक्त केले.
सदर कामगिरी मा. पोलीस आयुक्त साो, श्री. संदिप कर्णिक साो. मा. पोलीस उप आयुक्त सो. गुन्हे, प्रशांत बच्छाव साो. मा. सहा. पोलीस आयुक्त साो. डॉ. सिताराम कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय ढमाळ, सपोनि हेमंत तोडकर, पोहवा शरद सोनवणे, महेश साळुंके, पोना मिलींद परदेशी, पोलीस अंमलदार विलास चारोस्कर, राहुल पालखेडे, अमोल कोष्टी, नितीन जगताप, राजु राठोड, मुक्तार शेख, आप्पा पानवळ अशांनी केली आहे.