गुन्हेगारांचा कर्दनकाळ गुलाब सोनारांची पुन्हा एकदा दमदार कामगिरी……. पळून गेलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार सय्यद च्या भद्रकालीत आवळल्या मुसक्या..!
लाल दिवा-नाशिक,ता .२९: देवळाली पो स्टे कडील कलम ३२६,३२३,५०४,५०६,३४ ह्या गुन्ह्यातील पळून गेलेला आरोपी यास गुन्हे शाखा युनिट दोन कडील पो हवा गुलाब सोनार यांनी ताब्यात घेवून कामगिरीचा धडाका सुरू ठेवला आहे.
दिनांक २४/१२/२०२३ रोजी दुपारचे वेळी आतिष भालेराव यांना काही अज्ञात इसमांनी जुने भांडणाची कुरापत काढून काहीतरी हत्याराने गंभीर दुखापत करून मारहाण केली होती. त्यामुळे अतिष भालेराव यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवळाली पो स्टे कडील गुन्हा रजि न १९३/2023 भा द वि कलम ३२६,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचा युनिट-२ कडून समांतर तपास सुरु असताना पोहवा/७८२ गुलाब सोनार यांना सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी अरमान मेहरबान सैयद वय २१ वर्ष, रा बजरंगवाडी, संताजीनगर, नाशिक पुणारोड, नाशिक यांने त्याचे साथीदारांसह मिळून केला असल्याची खात्रीशिर गोपनिय बातमी मिळाली.
संशयीत आरोपी अरमान सैयद याचा शोध घेत असताना त्याने यापुर्वी देखील खुन व खुनाचा प्रयत्न असे गुन्हे केले असल्याचे समजून आले. पोहवा गुलाब सोनार यांना अरमान सैयद हा भद्रकाली, दुधबाजार येथे येणार असल्याची गोपनिय बातमी मिळाल्याने त्यास पोनि रणजित नलवडे यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि संदेश पाडवी, सपोउपनि बाळु शेळके, पोहवा गुलाब सोनार, प्रशात वालझाडे, पोना नितिन फुलमाळी अशांचे पथकाने त्यास सापळा कारवाई करून ताब्यात घेतले असुन त्याने गुन्हा केला असल्याबाबत कबुल केल्याने त्यास पुढील कार्यवाही करीता देवळाली कॅम्प पो.स्टे ला हजर केले आहे.