१,६८,००० रोख रक्कम लुटणा-या आरोपींना उपनगर पोलीसांनी ठोकल्या बेडया… पोलीस उपायुक्त मोनिका राऊत व सहा. पोलीस उपायुक्त आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनी विजय पगारे यांची जबरदस्त कामगिरी…!
लाल दिवा-नाशिक,ता.२७ : दिनांक १८ डिसेंबर रोजी रात्री १०:१५ वा. इसम नामे प्रकाश बन्सी मरसाळे हा नेहमी प्रमाणे त्यांचे कंपनीची उधारीची रक्कम गोळा करून मोटार सायकल वरून वडनेर पाथर्डी रोडने विहीतगाव कडे येत असताना साई ग्रँड लॉन्स समोर, वडनेर पाथर्डी रोड याठिकाणी एका पांढ-या चारचाकी वाहनामध्ये चार इसमानी येवून प्रकाशच्या मोटार सायकलला कट मारून त्याला थांबवले. तसेच चारचाकी वाहनाच्या खाली उतरून प्रकाश याच्याकडून उधारीची रक्कम असलेली बॅक ओढण्याचा प्रयत्न केला प्रकाशने बॅग देण्यास विरोध गेला असता आरोपीने त्यांच्या कडील कोयत्याने प्रकाशचे डोक्यात वार करून त्याला जखमी केले. सदर बॅगेतील रोख रक्कम १,६८,००० रू. सह बॅग बळजबीने हिसकावुन पळून गेले म्हणुन सदर बाबत फिर्यादी यांनी उपनगर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून । गुरन ४६९/२०२३ भादवी ३९४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर बाबत माहिती प्राप्त होताच घटनेचे गांभीर्य ओळखून मा. पोलीस आयुक्त साो श्री संदिप कर्णिक साो यांच्या मार्गदर्शननानुसार मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-२, मोनिका राउत, मा. सहा. पोलीस आयुक्त नाशिकरोड विभाग श्री. आंनदा वाघ सो यांनी उपनगर पोलीस ठाणे पोलीस पथकास आरोपींचा शोध घेणे बाबत सुचना दिल्या. तसेच उपनगर पोलीस ठाणेचे गुन्हे शोध पथकास रवाना केले.
उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय पगारे व पोलीस निरीक्षक / गुन्हे श्री. बाबासाहेब दुकले यांच्या मार्गदर्शनानुसार उपनगर पोलीस ठाण्यावे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सपोनि सचिन विनायक चौधरी व अंमलदार पोहवा / ४० विनोद बाबु लखन, पोना /५८ सोमनाथ पांडुरंग गुंड, पोशि /२४४२ अनिल भागवत शिंदे, पोशि/२२९२ जयंत परशराम शिंदे, पोशि / २१४५ पंकज भास्कर कर्पे, पोशि/ २७६८ सुरज रामनाथ गवळी, पोशि/१०७५ सौरभ शशिकांत लोंढे, पोशि /११७३ संदेश विलास रघतवान, पोशिक २०८८/राहुल हिरामण जगताप असे दोन वेगवेगळया गटात पोलीस पथक संशयित आरोपीचा शोध घेण्यास रवाना झाले.
सदर गुन्हे शोध पथकाचे पोना गुंड व पोशिक जयंत शिंदे यांनी गुप्त बातमीदार यांच्या मदतीने रोकडोबावाडी परीसरातील दोन संशयित इसम फरार असल्याची माहिती मिळवली सदर बाबत गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक माहितीच्या आधारे तेच आरोपी असल्याची खात्री झाल्याने आरोपींचा तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेवून त्यांना शिताफिने पकडुन ताब्यात घेतले. आरोपींकडून ताब्यात घेवुन त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांची नावे. १) चंद्रकांत विजय काकडे, वय-२३, रा. काकडे गल्ली, रोकडोबावाडी, नाशिकरोड, नाशिक २) शाहबाज शफि शेख, वय-२१, रा. मदिना नगर, रोकडोबावाडी, नाशिकोड, नाशिक ३) सोनु छबु गवळी, वय-२०, रा. रोकडोबावाडी, देवळाली गाव, नाशिकरोड.
आरोपींकडे कसून चौकशी केली असून त्यांच्याकडून चोरी झालेल्या रकमे पैकी १,४०,०००/- रू रोख रक्कम तसेच गुन्हयात वापरलेली हयुंडई । २० कार एम एच १२ जीबी ६७०४ हस्तगत करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास सपोनि / शांताराम महाजन व मदतनीस पोहवा / १३१७ गोविंद दत्तात्रय भामरे हे करत आहेत….