ओझर ! १० वा मैल परिसरात देशी बनावटीचे ०२ पिस्टल व ०४ जिवंत काडतूसे जप्त नाशिक ग्रामीण पोलीसांचे विशेष पथकाची कारवाईत….
लाल दिवा-नाशिक,ता.२५: आगामी नववर्ष व ३१ डिसेंबर २०२३ च्या पार्श्वभुमीवर नाशिक ग्रामीण जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप यांचे आदेशान्वये ग्रामीण पोलीसांनी अवैध शस्त्रे विरोधी मोहिम हाती घेतली आहे.
त्याअनुषंगाने दिनांक २४/१२/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार मालेगाव शहरातून एका टॅक्सीमध्ये काही संशयीत घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगून नाशिकच्या दिशेने येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी ओझर १० वा मैल परिसरात सापळा रचून संशयीत टॅक्सी क्र. एम.एच.१५.जी.व्ही. २७५८ हे वाहन अडवून, वाहनातील संशयीत नामे मोहम्मद आरिफ मोहम्मद फारूख, वय ३६, रा. रजियाबाद, मालेगाव, ता. मालेगाव याची झडती घेतली असता, त्याचे कब्जात एका बॅगमध्ये देशी बनावटीचे ०२ पिस्टल व ०४ जिवंत काडतूसे मिळून आली. सदर इसम हा विनापरवाना बेकायदेशीररित्या घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगतांना मिळून आला असून त्याचेविरूध्द ओझर पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप व अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील तसेच विशेष पथकातील पोनि श्री. संजय गायकवाड, सपोउनि दिपक आहिरे, शांतराम नाठे, पोहवा सचिन धारणकर, चेतन संवत्सरकर, पोकॉ विनोद टिळे, गिरीष बागुल यांचे पथकाने सदरची कारवाई केली आहे.