साने गुरुजी संस्थेच्या विरोधकांना खणखणीत उत्तर देऊ :-आमदार नितेश राणे यांचा इशारा….!
लाल दिवा -नाशिक रोड,ता.२१: साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ ही शिक्षणाचा ज्ञानयज्ञ चालवणारी संस्था आता एकटी नाही त्यांच्या विरोधात असणाऱ्यांचा सामना थेट आमच्याशी आहे. संस्थेला कोणी धमक्या देत असेल अडथळे निर्माण करत असेल तर त्रास देत असेल तर त्यांना थेट आमच्याशी सामना करावा लागेल. संस्थेबरोबर माझ्याबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत संस्थेच्या प्रत्येक अडचणीमध्ये तुमच्या पाठीमागे उभा असल्याचे मत विधानसभा सदस्य आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले.
नाशिक रोड येथील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचा 62 वा वर्धापन दिन नाशिक रोड येथील संस्थेच्या सभागृहात नुकताच संपन्न झाला या कार्यक्रमाला विधानसभा सदस्य नितेश राणे, नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर, माजी महापौर अशोक दिवे, संस्थेचे अध्यक्ष प्रवीण जोशी, खजिनदार मिलिंद पांडे सचिव अनिल अरिगळे विश्वस्त डॉ भूषण कानवडे, जनसंपर्क विभाग प्रमुख प्राचार्य डॉ. भागिनाथ घोटेकर उपस्थित होते. यावेळी बीजी शेखर यांनी साने गुरुजी संस्थेचा वटवृक्ष झालेला असून ज्ञानदानाचे पवित्र कार्य ते करीत असल्याने उत्तम संस्काराचा परिस स्पर्श लाभलेला असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार नितेश राणे यांनी सांगितले की साने गुरुजी शिक्षण संस्थेवर होणारा प्रहार आम्ही अंगावर घेऊन सामोरे जाऊ. संस्थेविरोधात होणाऱ्या कारवाया दमदार त्या तक्रारी या संबंधी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून खरी परिस्थिती कथन करणार आहे. आम्ही सर्वच संस्थेच्या पाठीमागे खंबीर आहोत असेही यावेळी नितेश राणे यांनी सांगितले.
फोटो साने गुरुजी शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना आमदार नितेश राणे, माजी महापौर अशोक दिवे, पोलीस महानिरीक्षक बि जी शेखर, मिलिंद पांडे, अनिल अरिगळे, प्रवीण जोशी…