मालेगावाच्या स्वतंत्र पोलीस आयुक्तालयासाठी खा. सुभाष भामरे, आ. नीतेश राणे, ॲड. शिशिर हिरे यांची धडपड…!
लाल दिवा-नाशिक,ता.१८ : नागपूर ,महाराष्ट्रातील मालेगावची एकेकाळी “मिनी पाकिस्तान” अशी ओळख होती. सहजगत्या विनोदाने असं कोणीही बोलून जात असे. या ठिकाणी कधी काय होईल याचा नेम नाही. अनेक वेळेस हे शहर दंगलीने होरपळलेले आहे. अनेक हिंदू-मुस्लिम कुटुंब या ठिकाणी उद्ध्वस्त झाले आहेत. अनेकांचे संसार उजाडलेले आहेत. बहुतांश कुटुंबियांनी भीतीपोटी स्थलांतर केलेले आहे. महाराष्ट्रात अति संवेदनशील शहर म्हणून याकडे बघितले जाते. अशा या शहरात हिंदू मुस्लिम दोन्ही समाज बांधव भीतीच्या सावटाखाली दररोज जगतात. मालेगावात शांतता नांदावी यासाठी दोन्ही समाजाकडून नेहमीच शर्थीचे प्रयत्न केले जातात. परंतु काही जण “मिठात खडा टाकणारे आहेत” ज्यामुळे ते आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात. मालेगावच्या विकासासाठी अद्याप एकही नेत्याने कुठलेही ठोस पावले उचललेले नाहीत. ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. वास्तविक पाहता अतिसंवेदनशील शहर म्हणून या ठिकाणी पोलीस आयुक्तालय होणे गरजेचे होते. तशी अनेक वर्षांपासून नगरिंकाची मागणी देखील आहे. मात्र यावर कोणीही गंभीरतेने विषय घेऊ नये हे विशेष म्हणावे लागेल. परंतु या सर्व बाबींचा विचार करून खा. सुभाष भामरे, आ. नीतेश राणे, ॲड. शिशिर हिरे यांची धडपड सुरू असून मालेगावकर वासियांनी त्यांचे शब्द सुमनांनी स्वागत केले आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये हर्ष उल्हासाचे वातावरण दिसून येत आहे.
खा. सुभाष भामरे, आ. नीतेश राणे, ॲड. शिशिर हिरे यांनी सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून सर्व माहिती मालेगाव संदर्भात दिली आहे. मालेगाव मध्ये लवकरच स्वतंत्र पोलीस आयुक्तालय येणार असे आश्वासन ना. फडणवीस यांनी दिले आहे. वाढते खून, बलात्कार, दरोडे व अवैध्य व्यवसाय सर्रासपणे मालेगाव शहरात सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव्य पुढे आले आहे.
मालेगाव मध्ये चार ते पाच ठिकाणी एस.आर.पी.एफ चे स्वतंत्र पोलीस चौकी दिली आहे. त्याचा राज्य शासनाला मोठ्या प्रमाणात खर्च होतो आहे. पोलीस आयुक्तालय व्हावे यासाठी खुद्द पोलीस महानिरीक्षक तसेच पोलीस अधीक्षक यांनीच पोलीस महासंचालकांना पत्रव्यवहार केला आहे
सोमवारी माजी केंद्रीय मंत्री खा.डॉ. सुभाष भामरे, आ. नितेश राणे तसेच ॲड. शिशिर हिरे यांनी गृहमंत्र्यांची भेट घेऊन मागणी केली आहे.
मालेगाव स्वतंत्र जिल्हा व्हावा. तसेच एस.आर.पी.एफ. ला जेवढा खर्च होतो तेवढ्याच खर्चात जर पोलिस आयुक्त कार्यालय होत असेल तर येथे पोलीस आयुक्त कार्यालय व्हावे. येथील नागरिकांच्या हाताला रोजगार मिळावा. रस्ते वीज, पाणी असे विकास कामे व्हावीत. असे एक ना अनेक मागण्या गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांच्या होत्या. यासंदर्भात खा. सुभाष भामरे, आ. नीतेश राणे, ॲड. शिशिर हिरे यांनी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयासाठी गृहमंत्र्यांच्या कानावर हा विषय टाकून मार्गी लावल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मालेगावकर वासियामध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.