काष्टी येथे उभारणार क्रीडा संकुल ; मंत्री भुसे यांच्या पाठपुराव्याला यश….; क्रीडा मंत्री संजय बनसोड व नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांच्यात झालेल्या मंत्रालयातील बैठकीत निर्णय…..!
लाल दिवा-नाशिक,ता.२९:मालेगाव तालुक्यातील काष्टी येथे एकाच जागेवर कृषी विज्ञान संकुलात पाच महाविद्यालये ६५० एकरावर साकारण्यात येत आहेत. मंत्री दादाजी भुसे यांच्या प्रयत्नातून सुरू असलेल्या कृषी महाविद्यालयात क्रीडा संकुल देखील उभारण्यात यावे यासाठी मंत्री भुसे आग्रही होते. यासंदर्भात आज रोजी मंत्रालयात क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या बैठकीस क्रीडा मंत्री संजय बनसोड, मंत्री दादाजी भुसे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, तालुका क्रीडा अधिकारी अविनाश टीळे, उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग सुनील हांजे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, डॉ. सुहास दिवसे क्रीडा विभाग आयुक्त, आदी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत क्रीडा संकुल उभारणीसाठी क्रीडा मंत्र्यांनी 25 कोटी रुपयांच्या निधीला तत्वतः मान्यता दिली असल्याची माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
काष्टी येथील संभाव्य क्रीडा संकुला अंतर्गत प्रेक्षक गॅलरी, वाणिज्यीक प्रयोजनासाठी दुकांनांचे बांधकाम, बास्केटबॉल, खो खो, कब्बडी, व्हॉलिबॉल या सर्व खेळांची मैदाने, ४०० मौ. सिथेटोक धावन मार्ग, क्रीडा साहीत्य इत्यादी सुविधांचा समावेश यात करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री भुसे यांनी दिली आहे. या क्रीडा संकुलामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तसेच तालुक्यातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार असून मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. क्रीडा मंत्र्यांनी निधीस मंजुरी दिल्याने नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी क्रीडा मंत्र्यांचे आभार मानले आहेत.
मालेगाव तालुक्यातील काष्टी येथे एकूण पाच अभ्यासक्रम त्यात कृषी तंत्र विद्यालय (पॉलिटेक्निक), कृषी महाविद्यालय, उद्यान विद्या महाविद्यालय, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, हे अभ्यासक्रम असलेले कृषी महाविद्यालय उभारण्यात आले असून हे काम प्रगतीपथावर आहे. मंत्री दादाजी भुसे यांचा हा महत्वकांक्षी प्रकल्प असून या महाविद्यालयाच्या माध्यमांतून तरुणांना शिक्षणाची व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. अभ्यासक्रमा सोबतच हा तरुण सदृढ बनणे गरजेचे असल्याने मंत्री भुसे यांनी याठिकाणी क्रीडा संकुल उभारण्यासाठी आज क्रीडा मंत्र्यांसोबत बैठक घेतली.
पाच महाविद्यालये सुरु
तालुक्यातील काष्टी येथे कृषी विज्ञान संकुल निर्मितीस तसेच कृषी महाविद्यालय, उद्यान विद्या विद्यालय, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय ही पाच महाविद्यालये सुरु करण्यास 26 ऑगस्ट 2020 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली होती. 2020-21 पासून कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, 2021-22 पासून अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय सुरु झाले. तर उर्वरित तीन महाविद्यालये या वर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात आले आहेत.
- एकाच ठिकाणी कृषी शिक्षणाच्या विविध संधी
कृषी विज्ञान संकुलांतर्गत कृषी शिक्षणाबरोबरच कृषी पूरक उद्योग विकास, प्रक्रिया केंद्र, शेतकरी प्रशिक्षण केंद्र व सुविधा केंद्र, आदर्श रोपवाटिका संकुल, सर्व कृषी निविष्ठांचे संशोधन आणि निर्माण केंद्र असे विविध कृषी विषयक उपक्रम विकसित करण्याचे नियोजन असून. या संकुलामुळे नाशिक जिल्ह्यात एकाच ठिकाणी कृषी शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध झाल्या आहेत. कृषी पदवीधारकांच्या माध्यमातून विविध ठिकाणी कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करणे, ग्रामपातळीवरील विस्तार, ग्रामसेवक, कृषी मदतनीस, तज्ज्ञ प्रशिक्षक, कृषी संशोधक, आधुनिक शेतकरी यांना सहाय्य करून देशाच्या कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान देणे, कृषी आधारित स्टार्टअप्स सुरु करणे यासारख्या बाबी साध्य करणे यामुळे शक्य होणार आहे.